22 February 2018

News Flash

‘हो.. मी कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते’

प्रियांकाने तिच्या नात्याविषयीची कबुली दिली, पण...

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: February 9, 2018 2:37 PM

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडमध्ये नावारुपास आल्यानंतर ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा परदेशी कलाविश्वात आपलं नशिब आजमवण्यासाठी गेली आणि तिकडचीच झाली. सध्याच्या घडीला प्रियांका तिचा जास्तीत जास्त वेळ परदेशातच व्यतीत करते. ‘क्वांटिको’ या एका मालिकेमुळे परदेशातील घराघरात पोहोचलेल्या प्रियांकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आंतरराष्ट्रीय कलाविश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या ‘देसी गर्ल’च्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा मध्यंतरी बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या.

प्रियांका कोणाला डेट करते, कोणासोबत कुठे जाते या साऱ्याविषयी सोशल मीडियावरही बरेच फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले. किंबहुना काही परदेशी कलाकारांसोबतही तिचं नाव जोडलं गेलं होतं. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रियांकाने नुकताच एका मुलाखतीत अतिशय महत्त्वाचा खुलासा केला. ‘मी जोडीदाराशी प्रामाणिक असणाऱ्यांपैकी एक आहे. हो… मी एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये होते. पण, जवळास एक वर्षापासून मी एकटीच (सिंगल) आहे. काही व्यक्तींना मी भेटले. काही व्यक्तींसोबत मी वेळ व्यतीत केला, त्यांच्यासोबत बाहेरही गेले. पण, अजूनही मी माझे भान हरपलेले नाही’, असं प्रियांका ‘फिल्मफेअर’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

आपण एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत तिने त्या व्यक्तीच्या नावाचा उलगडा करणं मात्र प्रकर्षाने टाळलं. त्यामुळे आता प्रियांका नेमकी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होती, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. ‘मी बऱ्याच वेळानंतर अशी सिंगल आहे. अनेकांच्या नजरा माझ्यावर खिळलेल्या असतात. पण, मला कळत नाही मी या साऱ्याचं काय करु. (मिश्लिकपणे हसून) अर्थात मला चर्चेत राहणं आवडतं. इतरांच्या नजरा माझ्यावर खिळलेल्या आवडतात. शेवटी मी एक मुलगी आहे’, असंही तिने स्पष्ट केलं. माध्यमांच्या प्रश्नांना मोठ्या शिताफीने उत्तरं देण्याचा प्रियांकाचा हाच अंदाज अनेकांची मनं जिंकून जातो. जवळपास १७ वर्षांच्या करिअरमध्ये प्रियांकाने आतापर्यंत बऱ्याच मोठ्या निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. पण, सध्या मात्र ही अभिनेत्री तिच्या हॉलिवूड करिअरवरच सर्वात जास्त लक्ष केंद्रित करताना दिसतेय हेसुद्धा तितकच खरं.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

ugh

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

First Published on February 9, 2018 2:04 pm

Web Title: bollywood hollywood actress priyanka chopra says she was in a committed relationship
  1. No Comments.