News Flash

VIDEO : आइस स्केटिंग करत तिने धरला ‘घुमर’वर ठेका

व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात!

छाया सौजन्य- यु ट्यूब

‘पद्मावत’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, त्यातील ‘घुमर’ गाणं. श्रेया घोषालने गायलेल्या आणि संजय लीला भन्साळी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याने प्लेलिस्टमध्ये वरचे स्थान मिळवले. अनोखा ठेका, गाण्यात साकारलेली दृश्य आणि पारंपरिक ‘घुमर’ गाण्यावर ठेका धरणारी दीपिका अनेकांच्याच मनाचा ठाव घेऊन गेली. या गाण्यावर दीपिकाने ठेका धरल्यानंतर त्याचे अनेक व्हर्जन्स काही हौशी मंडळींनी सादर केले.

बास्केट बॉलच्या कोर्टपासून ते अगदी आइस स्केटिंगपर्यंत सर्वत ठाकाणी ‘घुमर’चीच जादू पाहायला मिळाली. सध्या सोशल मीडियावर आइस स्केटिंग करत ‘घुमर’ गाण्यावर ठेका धरणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मयुरी भंडारी हिच्या अगदी सुरेख आणि लयबद्ध परफॉर्मन्सने अनेकांचीच मनं जिंकली आहेत.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

‘घुमर’वर ठेका धरत आणि त्याला आइस स्केटिंगच्या सुरेख स्टेप्सची जोड देत मयुरीने हे नृत्य सादर केलं आहे. ज्यासाठी तिने गाण्याला शोभेल अशी वेशभूषाही केली आहे. मुख्य म्हणजे गाण्याच्या ठेक्यासोबतच शब्दांच्या अनुषंगाने तिच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्याजोगे आहेत. ‘पद्मावत’ प्रदर्शित होण्याच्या आनंदात हा परफॉर्मन्स सादर करण्यात आला आहे, असेही या व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले असून, काहींनी तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअरही केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 3:32 pm

Web Title: bollywood movie sanjay leela bhansali directed padmaavat movie song ghoomar deepika padukone dance on ice skating watch video
Next Stories
1 रणवीरच्या अतरंगी फॅशन सेन्सविषयी कतरिना म्हणते..
2 फेब्रुवारीत प्रदर्शित होणार हे दमदार चित्रपट
3 झीनत अमान यांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या व्यावसायिकाला अटक
Just Now!
X