News Flash

Sanju : ‘संजू’मधील नर्गिस यांची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?

चित्रपटाचा आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, यातून 'संजू'ची आई म्हणजेच अभिनेत्री नर्गिस यांची झलक पाहायला मिळत आहे.

संजू, sanju

चित्रपटाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे एक प्रकारचं आव्हानच असतं. पण, ते आव्हान पेलत काही दिग्दर्शकांनी बऱ्याच व्यक्तींचा जीवनप्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. बायोपिकमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील पात्रांची निवड. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘संजू’ Sanju हा चित्रपट साकारतानासुद्धा याविषयी काळजी घेतली असून, प्रत्येक पात्राची निवड अचूकपणे केली आहे.

‘संजू’च्या प्रत्येक पोस्टरमधून आणि ट्रेलरमधून याची उदाहरणं पाहायला मिळाली. संजय दत्तच्या भूमिकेसाठी अभिनेता रणबीर कपूरची निवड म्हणू नका किंवा मग सुनील दत्त यांच्या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी निवड म्हणू नका. प्रत्येक वेळी राकुमार हिरानी यांनी ‘संजू’तील अफलातून पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आणली. आता त्यांनी चित्रपटाचा आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणला असून, यातून ‘संजू’ची आई म्हणजेच अभिनेत्री नर्गिस यांची झलक पाहायला मिळत आहे. नर्गिस यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मनिषा कोइरालाचा संपूर्ण लूक पाहताना क्षणार्धासाठी आपण नर्गिस यांनाच पाहतोय, असा भास होतो. नर्गिस यांच्या चेहरेपट्टीपासून त्यांच्या केशरचनेपर्यंत प्रत्येक गोष्टीतील बारकावे टीपत मनिषा कोइरालाचा लूक साकारण्यात आला आहे.

वाचा : रणबीर- आलियाच्या प्रेमप्रकरणामुळे दुखावली कतरिना

हिरानी यांनी हा पोस्टर पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ती प्रेमाने त्याला संजू म्हणून हाक मारायची… आणि आज आपणही त्याला त्याच नावाने हाक मारतो…’ अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात त्याच्या आईचं महत्त्वाचं स्थान होतं. त्यांच्या जाण्याने संजूबाबाच्या आयुष्यात नेमके कोणते बदल झाले आणि त्या साऱ्याच्या त्याच्या आयुष्यावर काय परिणाम झाला हे या चित्रपटातून पाहता येणार आहे. सोनम कपूर, रणबीर कपूर, परेश रावल, मनिषा कोइराला यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 10:48 am

Web Title: bollywood movie sanju poster actress manisha koirala bears a striking resemblance to sanjay dutts mother nargis
Next Stories
1 रजनी द बॉस…’काला’ चित्रपट पाहण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून चाहत्यांची थिएटरबाहेर गर्दी
2 शबाना आजमी यांना मागावी लागली भारतीय रेल्वेची जाहीर माफी
3 ‘काला’ चित्रपटाच्या प्रदर्शन स्थगितीस न्यायालयाचा नकार