दिलीप ठाकूर
साठच्या दशकातील अनेक वैशिष्ट्यातील एक म्हणजे शम्मी कपूर, गीतकार हसरत जैयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन व पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या दर्जेदार हिंदी चित्रपट गीतांचा खजिना. केवढी तरी प्रेमाची आणि विरहाचीही गाणी. सहज आठवावीत आणि गुणगुणायला हवीत अशी. हेदेखील असेच,

ऐ गुलबदन, ऐ गुलबदन
फूलों की महक, काँटों की चुभन
तुझे देख के कहता है मेरा मन
कही आज किसी से मोहब्बत ना हो जाये

लेख टंडन दिग्दर्शित ‘प्रोफेसर’ (१९६२) मधील या गाण्यात आपल्या आठ-दहा मैत्रिणींसोबत एका छान निसर्गरम्य ठिकाणी फिरण्याचा आनंद घेणार्‍या कल्पनाला उद्देशून स्टाईलीश टोपी चढविलेला शम्मी कपूर मस्त गातोय, ती देखील ही छेडछाड एन्जॉय करतेय.

क्या हसीन मोड़पर आ गयी जिंदगानी
के हक़ीकत न बन जाये मेरी कहानी
जब आहें भरे ये ठंडी पवन, सीने में सुलग उठती है अगन

कल्पनाच्या मैत्रीणी दोरीच्या उड्या मारून पिकनिक एन्जॉय करताहेत तर शम्मी कपूर अंगाला झटके देत देत पण कल्पनावर लक्ष केंद्रित करून गातोय. तिच्या सौंदर्याची भरभरून दिलखुलास तारीफ करतोय, त्याचा कंटाळा कसला हो? चित्रपटाचे निर्माते एफ. सी. मेहरा यांच्या ‘ईगल फिल्म’चे चित्रपट कायमच उच्च निर्मिती मुल्ये असणारे असत याचा प्रत्यय या गाण्यातही येतोच, त्यामुळे गाणे आणखीनच खुलते.

क्या अजीब रंग में सज रही है खुदाई
के हर चीज मालिक ने सुंदर बनायीं
नदिया का चमकता है दर्पन, मुखड़ा देखे सपनों की दुल्हन

मोहम्मद रफीचा आवाज शम्मी कपूरला एकदमच फिट बसला होता, त्यामुळे शम्मी कपूरच गातोय असाच झकास फिल येतो आणि हे गाणे जास्तच खुलून रंगत वाढते. शम्मी कपूर इतका व असा समरसून जातो त्याला कल्पनाच्या मैत्रिणीही जणु दिसत नव्हत्या, आणि त्यात प्रसन्न निसर्गाची छान छान साथ,

मैं तुम ही से यूँ आँखें मिलाता चला हूँ
के तुम ही को मैं तुम से चुराता चला हूँ
मत पूछ मेरा दीवानापन आकाश से उँची दिल की उड़न

मैं तुम ही से यूँ आँखें मिलाता चला हूँ
के तुम ही को मैं तुम से चुराता चला हूँ
मत पूछ मेरा दीवानापन आकाश से उँची दिल की उड़न

नायकाने नायिकेच्या अखंड प्रेमात पडणाऱ्या गाण्यांची कमतरता नाही. त्यात रंगत कशी आणली जातेय हे जास्त महत्त्वाचे असते. हे गाणे निश्चितच तसे आहे. कधीही पाहावे कधीही गुणगुणावे, छान आनंद मिळतोच.