25 October 2020

News Flash

PHOTO : ‘अॅपल’च्या जाहिरातीवर झळकणारा रहमान पहिला भारतीय सेलिब्रिटी

जाहिरातीवर झळकणारा त्याचा सेल्फी पाहिला का?

ए.आर.रहमान

‘अॅपल’ हा ब्रँड आज सर्वाधिक चर्चिला जाणारा आणि अनेकांच्या पसंतीस उतरणारा ब्रॅंड आहे. कोणी या ब्रॅंडकडे ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून पाहतं, तर कोणाचा या ब्रॅँडकडे पाहण्याचा आणखी वेगळा दृष्टीकोन असतो. स्मार्टफोन आणि काही अफलातून गॅजेट्स उपलब्ध करुन देणाऱ्या या ब्रँडच्या जाहिरातीसुद्धा तितक्याच कल्पक आणि लक्षवेधी असतात. अशा या ब्रँडच्या एका जाहिरातीवर चक्क संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत याविषयीची माहिती दिली.

संगीत श्रेत्रात नवनवीन प्रयोग आणि तंत्र वापरात आणणाऱ्या रहमानच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. आपल्या संगीताने जगभरातील रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या रहमानने ‘अॅपल’लाही भुरळ घातली असं म्हणायला हरकत नाही. रहमानच्या एका कृष्णधवल सेल्फीची निवड आयफोनच्या जाहिरातीसाठी करण्यात आली असून, या ब्रॅंडच्या प्रमोशनसाठी निवडला गेलेला तो पहिला भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

वाचा : …तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

एक चांगला संगीतकार असण्यासोबतच रहमान चांगला छायाचित्रकारही आहे. खरंतर छायाचित्रकाराकडे असणारी नजर त्याच्याकडे आहे, असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर त्याने पोस्ट केलेले फोटो पाहता याचा प्रत्यय येतोय. विविध ठिकाणांना भेट देणारा रहमान नेहमीच त्या ठिकाणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करुन प्रेक्षकांपर्यंत ही सुरेख ठिकाणं पोहोचवतो. त्याच्या असंख्य फोटोंमधून एका सुरेख सेल्फीची निवड आयफोनच्या जाहिरातीसाठी करण्यात आली आहे. मुळात रहमानने तो सेल्फी आयफोनच्याच माध्यमातून टीपला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 10:25 am

Web Title: bollywood music maestro ar rahman becomes first indian to be featured in apple advertisement see photo
Next Stories
1 मलाइकाचं चाललंय काय?
2 अमृताला लागलं अल्लाउद्दीन खिल्जीचं वेड!
3 शब्दांच्या पलिकडले : तुम इतना जो मुस्करा रहे हो…
Just Now!
X