News Flash

अभिनंदन परतायच्या आत निर्मात्यांना लागले चित्रपटाचे वेध

या घटनेवर आधारित चित्रपट, वेब सीरिज किंवा टीव्ही शोच्या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. अभिनंदन भारतात परतायच्या आत बॉलिवूड निर्मात्यांना या घटनेवर चित्रपट निर्मितीचे वेध लागले आहेत. या घटनेवर आधारित चित्रपट, वेब सीरिज किंवा टीव्ही शोच्या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी निर्मात्यांची रांग लागली आहे.

‘हफींग्टनॉस्ट डॉट इन’ने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाने ज्या दिवशी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई केली, त्यानंतर लगेच मुंबईच्या अंधेरी इथल्या इंडियन पिक्चर्स प्रॉड्युसर्स असोसिएशनच्या (IMPPA) कार्यालयात जवळपास पाच प्रॉडक्शन हाऊसचे निर्माते देशभक्तीपर चित्रपटांच्या शीर्षकाची नोंदणी करण्यासाठी जमले होते. ‘बालाकोट’, ‘सर्जिकल स्ट्राइक्स २.०’, ‘पुलवामा अटॅक्स’ यांसारख्या शीर्षकासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू होती असं तिथल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ‘हाऊज द जोश’ या नावाचीही नोंदणी झाल्याची माहिती आहे.

सर्जिकल स्ट्राइकवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक गल्ला जमवला. देशभक्तीपर चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल पाहता चित्रपट निर्मात्यांनी शीर्षक नोंदणीसाठी गर्दी केली आहे. आतापर्यंत ‘पुलवामा’, ‘पुलवामा : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘वॉर रुम’, ‘हिंदुस्तान हमारा है’, ‘पुलवामा टेरर अटॅक’, ‘द अटॅक्स ऑफ पुलवामा’, ‘ATS- वन मॅन शो’ या नावांची नोंदणी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 5:45 pm

Web Title: bollywood producers battling for movie titles post iaf strike pulwama terror attack
Next Stories
1 दीपिका नाही तर हा असेल भन्साळींच्या आगामी चित्रपटातला नवा चेहरा
2 ऑस्कर विजेता अभिनेता करणार बॉण्डपटात विलनचा रोल
3 नवाजलाही वाटतंय बॉलिवूडमध्ये ‘खान’चा जमाना न संपणारा
Just Now!
X