News Flash

‘दीपिकाला फूलं देण्यासाठी किती खर्च करतोस’? वडिलांच्या प्रश्नावर रणवीरचं थक्क करणारं उत्तर

पाहा, रणवीरने काय उत्तर दिलं

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्याकडे पाहिलं जातं. एका चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी या दोघांची लव्हस्टोरी आहे. बऱ्याच वेळा हे दोघंही एकमेकांप्रतीचं प्रेम जाहीरपणे व्यक्त करत असतात. त्यामुळे या दोघांची बऱ्याचवेळा चर्चा रंगत असते. यावेळी चाहत्यांमध्ये या जोडीच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. लग्नापूर्वी रणवीर कायम दीपिकाला तिला आवडणारी फूलं द्यायचा, हे पाहून त्याच्या वडिलांनी रणवीरला एक भन्नाट प्रश्न विचारला होता. याविषयी रणवीरने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

दीपिका-रणवीर या जोडीने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी या दोघांमध्ये चांगली मैत्री होती, त्यामुळे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि बराच काळ त्यांनी एकमेकांना डेटही केलं. त्यामुळे एका इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये रणवीरने त्यांच्या डेटींगच्या काळातील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. यात एकदा दिपिकाला महागडी फुलं गिफ्ट केल्यामुळे वडिलांनी इतका पैसा खर्च का करतोस असा प्रश्न विचारला होता.

“दीपिकाला डेट करायला लागल्यानंतरच मला सतत जाणवत होतं की मी हिच्याशीच लग्न करणार. त्यामुळे मला हळूहळू तिच्या आवडीनिवडीही कळू लागल्या होत्या, तिला लिलीची फुलं फार आवडतात. एकतर मला आयुष्यभरासाठी तिची साथ हवी होती,म्हणून मी कायम तिला भेटायला जातांना लिलीची फूलं भेटवस्तू म्हणून घेऊन जायचो. ती सेटवर असताना सुद्धा मी फूल घेऊन जायचो”, असं रणवीरने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “मी दीपिकासाठी असं रोज फूलं घेऊन जात असल्याचं माझ्या वडिलांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे एक दिवस त्यांनी न रहावून मला एक प्रश्न विचारलाच. ‘तुला अंदाज आहे, तू फुलांवर किती पैसे खर्च करतोय त्याचा?’ वडिलांचा हा प्रश्न ऐकल्यानंतर मी त्यांच अंदाजात त्यांना उत्तर दिलं. हेच पैसे लक्ष्मीच्या रुपात परत आपल्याकडे येतील.

दरम्यान, दीपिका आणि रणवीर हे दोघं अनेकांचं आवडतं कपल आहे. सध्या लॉकडाउन असल्यामुळे हे दोघंही घरी राहून एकमेकांना वेळ देत आहेत. विशेष म्हणजे या काळातही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 1:35 pm

Web Title: bollywood when ranveer singh father asked him about spending money on flowers for deepika padukone ssj 93
Next Stories
1 सोनू सूदला पद्मविभूषण देण्याची मागणी, आपल्या उत्तराने अभिनेत्याने जिंकलं चाहत्यांचं मन
2 “स्वप्नांच मरणं अत्यंत त्रासदायक असतं”; अभिनेत्रीच्या आत्महत्येवर करण कुंद्राची प्रतिक्रिया
3 अभिनेत्री विद्या बालनचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण
Just Now!
X