News Flash

‘शिवाय’ सिनेमाचे ‘बोलो हर हर हर’ गाणे प्रदर्शित

हे गाणे मोहित चौहान, सुखविंदर सिंग, मेघा श्रीमन आणि डैल्टन यांनी गायले आहे

या सिनेमात एक नव्हे तर अनेक 'सरप्राईज' पाहायला मिळणार आहेत

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे दिग्दर्शन असलेला ‘शिवाय’ सिनेमाचे बोलो हर हर हर गाणे रविवारी व्हिडियोसह प्रदर्शित झाले. २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात अभिनय आणि दिग्दर्शन अशा दुहेरी भूमिका अजयने निभावल्या आहेत. सिनेमाचे हे गाणे ऐकताना मंत्रोच्चारण करत आहोत असेच वाटते. या गाण्याला मोहित चौहान, सुखविंदर सिंग, मेघा श्रीमन आणि डैल्टन यांनी आवाज दिला आहे. तर रॅपसाठी लोकप्रिय असणाऱ्या बादशहाने हे गाणे रॅप केले आहे. ३.३० मिनिटांचं हे गाणं सध्या तरी व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सिनेमाशी निगडीत चर्चेमध्ये अजय बोलला की, हा सिनेमा कोणत्याही एका धर्मावर किंवा जातीवर बेतलेला नाही. या सिनेमात मी शंकराची भूमिकाही करत नाहीए. जर तुम्ही गाण्याच्या बोलांकडे लक्ष द्याल तर ‘जिसके भीतर बसा शिवाय’, म्हणजे ज्याच्या मनात शीव आहे असा तो… सिनेमात माझी व्यक्तिरेखा ही ध्यानाला बसलेली, तप करणारी अशी नाहीए. फक्त त्या व्यक्तिरेखेने त्याच्या अंगावर शिवाचे टॅटू कोरले आहेत आणि त्याचे नाव ‘शिवाय’ आहे. या सिनेमात अजयसोबत साएशा सिंघल आणि इरिका कारही दिसतील. ‘शिवाय’ सिनेमासोबतच करण जोहरची रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि फवाद खान यांचा ‘ए दिल है मुश्किल’ सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या २८ ऑक्टोबरला कोणाचं पारडं किती जड होतं हे लवकरच कळेल.
काही दिवसांपूर्वी अजय देवगणने कमाल आर खानवर करण जोहरकडून २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. केआरकेने ट्विटरवर अजयच्या शिवायबद्दल वाईट बोलले होते आणि करणच्या ऐ दिल है मुश्किलची प्रशंसा केली होती. याबाबतीत जेव्हा अजयचे सहकारी कुमार मंगत आणि केआरकेचे बोलणे झाले तेव्हा केआरके काही सेकंदासाठी फक्त हसत राहिला होता. नंतर या गोष्टीवर जोर दिल्यानंतर तो म्हणाला की, ‘करणला पाठिंबा तर द्यावाच लागेल, जो माणूस २५ लाख रुपये देतो त्याला पाठिंबा तर द्यावाच लागणार ना!’ हा त्याचा ऑडिओ अजयने काही दिवसांपूर्वी ट्विट केला होता आणि याबद्दल चौकशीची मागणीही केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 9:12 pm

Web Title: bolo har har har song of the ajay devgn movie shivaay rocked youtube
Next Stories
1 ‘तुतक तुतक तुतिया’ सिनेमाला किंग खानचा आवाज
2 या बॉलिवूड अभिनेत्रीवरही चढली ‘झिंगाट’ची क्रेझ
3 प्रियांका-सनीचा ‘दोस्ताना’
Just Now!
X