News Flash

बोमन इराणी यांच्या बहिणीच्या घरी कोट्यवधींची चोरी

घरकाम करणाऱ्या महिलेने कोट्यवधींचे दागिने केले लंपास

बंगळुरु पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची चोरी करुन पळणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही माहिला प्रसिद्ध अभिनेता बोमन इराणी यांची बहिण खुर्शीद इराणी हिचा घरी घरकाम करायची. काही दिवसांपूर्वी तिच्या घरातून १ कोटी रुपयांचे दागिने आणि ११ लाख रुपये रोख चोरीला गेले होते. या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु असताना आरोपी महिलेला बंगळुरु येथून अटक करण्यात आली आहे.

अवश्य पाहा – चला आत्मनिर्भर होऊया; बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी सोनू सूद देतोय रिक्शा

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार आरोपी महिलेचं नाव मेरी अॅलिस असं आहे. ती गेल्या पाच वर्षांपासून खुर्शीदच्या घरी काम करत होती. काही दिवसांपूर्वी खुर्शीदच्या घरी चोरी झाली. विशेष म्हणजे चोरी झाल्यापासून घरकाम करणारी मेरीदेखील कामावर येत नव्हती. परिणामी पोलिसांचा संशय तिच्यावरच गेला. अन् पोलीस तिचा शोध घेऊ लागले. अखेर मोबाईल लोकेशनच्या साहाय्याने बंगळुरु येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिच्यासोबत तिचा २२ वर्षांचा मुलगा मायकल देखील होता. त्यांच्याकडून १ कोटी रुपयांचे दागिने आणि ११ लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले. सध्या दोघंही पोलीस कोठडीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 1:11 pm

Web Title: boman iranis cousins house robbed mppg 94
Next Stories
1 गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट्स देण्यासाठी बॉलिवूड लेखकाची अजब युक्ती; पोलिसांनी केली अटक
2 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत नवं वळण
3 “मम्मी कसम.. हे गाणं पाहून व्हाल वेडे”; राजपाल यादवनं शेअर केला मंत्रमुग्ध करणारा व्हिडीओ
Just Now!
X