News Flash

ब्रॅड पिट-अँजेलिना जोलीचा फ्रान्समध्ये गुपचुप विवाह

जगभरातील चित्रपट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेली हॉलिवूडची सुपरस्टार जोडी अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट अखेर विवाह बंधनात अडकली आहे.

| August 29, 2014 04:28 am

जगभरातील चित्रपट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेली हॉलिवूडची सुपरस्टार जोडी अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट अखेर विवाह बंधनात अडकली आहे. तब्बल नऊ वर्षे एकत्र राहिल्यानंतर गेल्या शनिवारी या दोघांनी एका खासगी समारंभात गुपचुप विवाह केला.  यावेळी त्यांची सहा मुलेही उपस्थित होती. २०१२ मध्ये ब्रॅड पिट-अँजेलिना जोडीने साखरपुडा केला होता. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी ते विवाह बंधनात अडकले. ब्रॅड पिट आणि अँजेलिना हे दोघेही कॅलिफोर्नियाचे रहिवासी आहेत. त्यामुळे फ्रान्सला येण्यापूर्वीच त्यांनी  कॅलिफोर्नियातील एका स्थानिक न्यायाधिशाकडून या जोडीने विवाह प्रमाणपत्र घेतले. विशेष म्हणजे सदर न्यायाधीशही या सोहळ्याला उपस्थित होते. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 4:28 am

Web Title: brad pitt and angelina jolies secret wedding
Next Stories
1 ‘रॉ स्टार’चे चित्रीकरण चार तास खोळंबले
2 गणेशोत्सव विशेष : दिवस सरले, उरल्या आठवणी! – वीणा जामकर
3 बहिणीचा हट्ट, पण पोशाख घट्ट
Just Now!
X