10 July 2020

News Flash

शाहिद आणि करीना विभक्त होण्यामागे ‘हे’ होतं खरं कारण

'फिदा' चित्रपटातून त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली

कधीकाळी कलाविश्वामध्ये लव्हबर्ड्स म्हणून शाहिद कपूर आणि करीना कपूरकडे पाहिलं जायचं. २००४ साली ‘फिदा’ चित्रपटातून या दोघांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. मात्र . ‘जब वी मेट’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांच्या नात्याला तडा केला. या दोघांनी विभक्त होणं पसंत केलं. त्यानंतर दोघांच्याही करीअरच्या आणि आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्या. आज शाहिदने मीरा राजपूतसोबत संसार थाटला आहे. तर करीनानेही अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं आहे. मात्र आजही करीना आणि शाहिदचं ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणामुळे झालं हे कोणाला माहित नाही.

बऱ्याच वेळा शाहिद आणि करीना उघड उघडपणे त्यांच्या ब्रेकअपविषयी बोलत असतात. मात्र या नात्यात नेमका दुरावा कोणत्या कारणामुळे आला हे कोणालाच कळू शकलं नाही. आज शाहिदचा वाढदिवस आहे. त्यामुळे जाणून घेऊयात त्याच्या ब्रेकअपविषयी.

२००४ मध्ये ‘फिदा’ या चित्रपटातून शाहिद आणि करीनाच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. दोघांची पहिल्यांदा या चित्रपटाच्या सेटवरच भेट झाली. या चित्रपटातून शाहिदला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं तर त्यावेळी करीना बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. असे असतानाही करीनानेच शाहिद कपूरला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने ही गोष्ट सांगितली होती. इतकंच नाही तर अनेक फोन आणि मॅसेज केल्यानंतर शाहिदने तिच्या प्रपोजलला होकार दिल्याचेही तिने सांगितले होते.

वाचा : दिव्या भारतीमुळे ‘ही’ अभिनेत्री झाली सुपरस्टार

पडद्यावरील दोघांची जोडी यशस्वी ठरली नसली तरी रिअल लाइफमधील दोघांच्या प्रेमाचे किस्से खूप चर्चेत होते. ‘जब वी मेट’ चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या नात्याला तडा जाऊ लागला होता. २००६ मध्ये ‘जब वी मेट’ चित्रपटाची शूटिंग सुरू होण्यापूर्वी दोघांमध्ये सर्वकाही ठीक होतं मात्र शूटिंग संपताना दोघांमधील दुरावा वाढला. चित्रपटाच्या सेटवर दोघांमधील गप्पा कमी झाल्या होत्या. इतकंच नाही तर शेवटचा सीन शूट करताना दोघेही वेगवेगळ्या गाडीने सेटवर आले. अभिनेत्री अमृता रावसोबत शाहिदची जवळीक वाढल्याच्या कारणाने करीना आणि शाहिदमध्ये दुरावा वाढला असे म्हटले जाते. दुसऱ्या बाजून करीना आणि सैफ अली खानसुद्धा एकमेकांजवळ येऊ लागले होते. २००७ मध्ये जेव्हा करीना ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सैफसोबत दिसली तेव्हा शाहिद-करीनाच्या ब्रेकअपच्या बातमीची खातरजमा झाली.

पाहा : संपत्तीमध्येही सलमान आहे ‘दबंग’; जाणून घ्या कुठे काय आहे प्रॉपर्टी

असे म्हटले जाते की अनेकदा करीनाने शाहिदसोबत पॅचअपसाठी प्रयत्न केले होते. मात्र ब्रेकअपचा शेवटचा कॉलसुद्धा शाहिदनेच केला. ब्रेकअपबद्दल दोघांनी माध्यमांसमोर कधीच खुलेपणाने वाच्यता केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2020 9:16 am

Web Title: break up story of shahid kapoor and kareena kapoor ssj 93
Next Stories
1 दिव्या भारतीमुळे ‘ही’ अभिनेत्री झाली सुपरस्टार
2 ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम तेजश्रीने श्रीदेवींना वाहिली अनोखी श्रद्धांजली
3 आजही मराठी कलाकार ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत- डॉ. अमोल कोल्हे
Just Now!
X