News Flash

अभिषेकचा डिजिटल डेब्यु; ‘या’ सीरिजमध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

जाणून घ्या, अभिषेकच्या नव्या सीरिजविषयी

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन या नावाचं फार मोठं प्रस्थ असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलाने अभिषेक बच्चनने कलाविश्वात पदार्पण केलं. काही मोजक्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची बाजू दाखविणाऱ्या अभिषेकने त्याची पावलं वेबविश्वाकडे वळविली आहेत. लवकरच तो डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय आणि नावाजलेल्या अॅमेझॉन प्राइमच्या आगामी ‘breathe in to the shadows’ या नव्या वेबसीरिजमध्ये अभिषेक झळकणार आहे. अलिकडेच या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


२०१८ मध्ये अॅमेझॉन प्राइमवर ‘ब्रीद’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ही सीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरली होती. या सीरिजमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार आर. माधवन आणि अमित साध यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे या सीरिजचा पुढील सीझन प्रदर्शित व्हावा अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येत होती. सुरुवातीला ‘breathe in to the shadows’ चं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर हा ब्रीदचा पुढचा सीझन असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. मात्र हा पुढील सीझन नसून नवीन वेबसीरिज आहे.

दरम्यान, सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असलेली ही सीरिज येत्या १० जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनसह अभिनेता अमित साध, सयामी खेर आणि निथ्या मेनन देखील झळकणार आहे. निथ्या मेननचादेखील हा डिजिटल डेब्यु असल्याचं म्हटलं जात आहे. या सीरिजची निर्मिती अबुंदंतिया एन्टरटेन्मेंट यांनी केली असून दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 3:17 pm

Web Title: breathe into the shadows abhishek bachchan shares first look of his web debut ssj 93
Next Stories
1 मिलिंद सोमणने घरच्या घरीच पिकवल्या फळभाज्या; पाहा टेरेस गार्डनिंगचे फोटो
2 १० वर्षांपूर्वी असा दिसायचा सिद्धार्थ चांदेकर; फोटो पाहून व्हाल थक्क
3 ‘बॉलिवूड क्वीन’ हेअरस्टायलिशच्या रुपात; बहिणीचा केला हेअरकट
Just Now!
X