News Flash

आणखी एक सेलिब्रिटी जोडपे होणार विभक्त

चित्रपटाचा विषय पुढे गेला नाही, पण त्यांची प्रेमकहाणी मात्र सुरु झाली होती

अनुष्का शंकर, जो राईट

सतार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी आणि प्रसिद्ध संगीत दिग्दर्शिका, सतार वादिका अनुष्का शंकर हिच्या वैवाहिक जीवनात वादळ आले आहे. अनुष्का आणि दिग्दर्शक जो राइट यांच्या नात्यात दुरावा आला असून, त्या दोघांनीही आता लग्नाच्या नात्यातून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विभक्त होण्याच्या निर्णयानंतरही मुलांचे संगोपन आणि त्यांच्या जबाबदारीसाठी अनुष्का आणि जो यांना काही अटींचे पालन करावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनुष्का आणि जो २००९ मध्ये विलियम डलरिम्पल यांच्या दिल्ली येथील घरी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत झाली होती. पहिल्या भेटीनंतर जो आणि अनुष्का एकमेकांना डेट करु लागले आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वदूर पसरली. जो हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’, ‘अटॉन्मेंट’ या चित्रपटांचे दिग्दर्शक केले आहे.

वाचा : पुन्हा चरित्रपटांची लाट!

जो ‘इंडियन समर’ या चित्रपटासाठी भारतात आला होता. त्याचवेळी जो ने आपली ऑडिशन घेतल्याचे अनुष्काने एका मुलाखतीत सांगितले होते. या चित्रपटासाठी त्याने अनुष्कापुढे इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झालाच नाही. पण, जो आणि अनुष्काच्या प्रेमप्रकरणाला मात्र त्याचदरम्यान सुरुवात झाली होती. एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर साधारण वर्षभरात त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 4:48 pm

Web Title: british indian composer anoushka shankar and film director joe wright marriage comes to an end
Next Stories
1 या दोन स्पर्धकांना विकास गुप्ता देणार बक्षिसाची रक्कम
2 एक चाहता असाही..
3 मॉडेल अर्पिता तिवारीची हत्याच!
Just Now!
X