23 November 2020

News Flash

करोना काळात BTS ने दिला खास संदेश; ‘लाइफ गोज ऑन’गाणं प्रदर्शित

करोनामय जगाला BTS ने दिली गाण्यातून लढण्याची प्रेरणा

BTS हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय म्युझिक बँड्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा दक्षिण कोरियन बॉय बँड आता एक नवं गाणं घेऊन रसिकांच्या भेटीस आला आहे. त्यांच्या या नव्या गाण्याचं नाव ‘लाइफ गोज ऑन’ असं आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी करोनाग्रस्त जगाला संकटांशी लढण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे काही तासांत दोन कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांनी या गाण्याचा व्हिडीओ पाहिला आहे.

सध्या संपूर्ण जग करोनाग्रस्त वातावरणामुळे त्रस्त आहे. जगभरातील लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता पसरत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत संकटांशी दोन हात करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी BTS बँडने या गाण्याची निर्मिती केली आहे. करोनाचा प्रसार होण्यापूर्वी आपण कसं जगत होतो अन् आता आपण कसं जगतोय याचं सुरेख चित्रण या गाण्यामध्ये केलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन जंन जंग कुके याने केलं आहे. हे गाणं कोरियन भाषेत आहे मात्र त्याला इंग्रजी भाषेत कोरस देण्यात आलं आहे. जेणेकरुन कोरियन न समजणारे रसिक देखील या गाण्याचा आनंद घेऊ शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 6:59 pm

Web Title: bts band released new song life goes on dcp 98
Next Stories
1 सलमान खान ‘तेरे नाम’च्या सिक्लवमध्ये झळकणार का? दिग्दर्शक म्हणाला…
2  देवमाणूसमधील ‘ही’ अभिनेत्री आहे स्वप्नील जोशीची जबरा फॅन
3 ‘बदला लेना मजबुरी नहीं, जरुरत बन गईं हैं’; राजीव खंडेलवालची ‘नक्षलबारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X