20 January 2021

News Flash

२० मिनिटांत १ कोटी लोकांनी पाहिला ‘हा’ व्हिडीओ; तुटला YouTube चा जुना विक्रम

BTS ने रचला नवा विश्व विक्रम; ठरला YouTubeवर सर्वाधिक पाहिला जाणार व्हिडीओ

प्रसिद्ध कोरियन म्युझिक बँड BTS चं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘डायनामाइट’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. केवळ युरोप अमेरिकाच नाही तर भारतातही हे गाणं चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे केवळ २४ तासांत या गाण्याने युट्यूबवर सर्वाधिक व्हूजचा एक विक्रम प्रस्थापित केला आहे. ‘डायनामाइट’ला अवघ्या २४ तासांत तब्बल १० कोटी व्हूज मिळाले आहेत.

अवश्य पाहा – सासू-सुनेच्या भांडणावर रॅप साँग; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

BTS हे प्रसिद्ध कोरियन म्युझिक बँड आहे. वी, आरएम, सुगा, जिन, जंगकुक, जे हॉप आणि जिमिन या सात कलाकारांनी मिळून हा ग्रुप सुरु केला. या ग्रुपने वर्ल्ड स्टेज शोमध्ये देखील कमाल केली होती. या संगीत स्पर्धेमुळे ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. ‘डायनामाइट’ हे त्यांचं पहिलं इंग्लिश गाणं आहे. या गाण्याने प्रदर्शित होताच अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पहिल्या २० मिनिटांत तब्बल एक कोटी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला होता. त्यानंतर ‘डायनामाइट’ला अवघ्या २४ तासांत तब्बल १० कोटी व्हूज मिळाले आहेत. यावरुन BTSच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. यापूर्वी सर्वाधिक व्हूजचा विक्रम ब्लॅकपिंक या ग्रुपच्या नावावर होता. त्यांच्या ‘हाउ यू लाइक दॅट’ या गाण्याला २४ तासांत सात कोटी लोकांनी पाहिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 5:42 pm

Web Title: bts video dynamite breaks youtube record for most views in 24 hours mppg 94
Next Stories
1 ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मध्ये लवकरच होणार नवी एण्ट्री
2 सुशांतच्या फॅनकडून आता केली जातेय ‘कपिल शर्मा शो’वर बहिष्कार टाकण्याची मागणी?
3 संघर्षाच्या काळात…; बिग बींनी सांगितलं आयुष्यातील कटू सत्य
Just Now!
X