भारतीय संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानचा कॅनडामध्ये नुकताच सन्मान करण्यात आला आहे. कॅनडामधील एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आल्याची माहिती स्वतः ट्विटर रेहमान दिली आहे.
कॅनडातील मरखम शहरातील एका रस्ताचे नामकरण `अल्ला-राखा रेहमान स्ट्रीट` असे करण्यात आले आहे. ही माहिती देताना रेहमानने आपले छायाचित्रही ट्विटरवर पोस्ट आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवानिमित्त कॅनडातील टोरान्टो शहरात ४ नोव्हेंबर रोजी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, मरखममधील एका रस्त्याला ए. आर. रेहमान यांचे नाव देत असल्याची घोषणा करण्यात आली. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा, सन्मानांचा मानकरी असलेल्या रेहमानही या गौरवाने भारावून गेल्याचे म्हटले आहे.
(छाया सौजन्यः ए.आर.रेहमान ट्विट)
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2013 रोजी प्रकाशित
कॅनडामधील रस्त्याला ए आर रेहमानचे नाव
भारतीय संगीत दिग्दर्शक ए. आर. रेहमानचा कॅनडामध्ये नुकताच सन्मान करण्यात आला आहे.
First published on: 06-11-2013 at 11:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cana da street named by a r rehman