ऐश्वर्या राय-बच्चनच्या चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेला तो क्षण अखेर प्रत्यक्षात आला. ऐश्वर्या-राय बच्चन ६७व्या कान चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगली होती. फॅशन सिम्बॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान महोत्सवातील रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय सोनेरी रंगाच्या रॉबर्टो कॅवेली फिशटेल गाऊन मध्ये अवतरली तेव्हा साऱ्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. या सोहळ्यात येण्यासाठी ऐश्वर्या काहीशी उशीरा आली तरी, आल्यानंतर आपल्या लूक आणि पेहरावाने तिने सगळ्याची कसर भरून काढली. लोरिएल पॅरिसची दूत म्हणून सोहळ्याला आलेली ऐश्वर्या राय सोनेरी रंगातील एखाद्या झळाळत्या मत्स्यकन्येप्रमाणे शोभून दिसत होती.
जगभरात मानाचे स्थान असणाऱ्या ६७व्या कान चित्रपट महोत्सवासाठी ऐश्वर्या राय-बच्चन आपली मुलगी आराध्या आणि आई ब्रिंदा राय यांच्याबरोबर दाखल झाली आहे. फ्रान्समधील हवाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐश्वर्याचा कान्सप्रवेश काहीसा लांबणीवर पडला होता. आतापर्यंत कान महोत्सवासाठी बॉलिवूडमधील सोनम कपूर, उदय चोप्रा आणि मल्लिका शेरावत यांनी हजेरी लावली आहे. कान्स महोत्सवाच्या कान महोत्सवातील ऐश्वर्याचे फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2014 रोजी प्रकाशित
कान महोत्सवातील रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय मत्स्यकन्येच्या रूपात
ऐश्वर्या राय-बच्चनच्या चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेला तो क्षण अखेर प्रत्यक्षात आला. ऐश्वर्या-राय बच्चन ६७व्या कान चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगली होती.

First published on: 21-05-2014 at 02:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cannes film festival aishwarya rai bachchan is a golden delight in first appearance