News Flash

आपल्या मुलाच्या रुपात तुझ्या परतण्याची वाट बघते, चिरंजीवी सरजाच्या पत्नीची भावूक पोस्ट

सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

आपल्या मुलाच्या रुपात तुझ्या परतण्याची वाट बघते, चिरंजीवी सरजाच्या पत्नीची भावूक पोस्ट

कन्नड चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी सरजा यांचे ७ जून २०२० रोजी निधन झाले. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा वयाच्या ३९व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांची पत्नी मेघना राजला मोठा धक्काच बसला. त्यानंतर काही दिवसांनी मेघना गरोदर असल्याचे समोर आले. आता मेघनाने एक पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने पोस्टमध्ये मुलाच्या रुपात तुझ्या परतण्याची वाट पाहत असे म्हटले आहे.

मेघनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने, ‘चिरु, मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण तुझ्यासाठी माझ्या मनात असलेल्या भावना मला शब्दात व्यक्त करता नाही येत’ असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

MY CHIRU FOREVER

A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj) on

‘तुझे माझ्यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे तू मला कधीही सोडून जाऊ शकला नाहीस. आपले मूल हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट असणार आहे. ते आपल्या प्रेमाची निशाणी आहे. मी आपल्या मुलाच्या रुपात तुझ्या परतण्याची वाट बघते. तुझा हसरा चेहरा पाहण्यासाठी मी फार काळ वाट नाही पाहू शकत’ असे तिने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.

चिरंजीवी यांनी २०१८मध्ये मेघना राजशी लग्न केले होते. जवळपास १० वर्षे एकमेकांना ओळखत असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर पुढे नात्यात झाले. मेघना या सुद्धा एक अभिनेत्री आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 7:55 pm

Web Title: cant wait to bring you back to earth as our child meghana raj note for husband chiranjeevi sarja avb 95
Next Stories
1 “पूर्व जन्माच्या कर्मामुळे काम मिळतय”; सोनम कपूरच्या ट्विटवर नेटकऱ्यांचा संताप
2 सलमान आणि सुशांतचा जुना व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचा केआरकेवर निशाणा
3 क्वारंटाईनमुळे चित्रपट निर्मात्याची आत्महत्या; २७व्या मजल्यावरुन उडी घेत संपवलं आयुष्य
Just Now!
X