News Flash

‘कॅसाब्लांका’ची पंच्याहत्तरी

‘रिक’ आणि ‘इल्सा’ची अजरामर प्रेमकथा

हॉलीवूडपट म्हटले की चटकन डोळ्यासमोर येतात ते मारधाड करणारे अ‍ॅक्शनपट किंवा कुठल्याशा ग्रहावर जाऊन चित्रविचित्र संशोधन करणारे विज्ञानपट. ‘टायटॅनिक’, ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’, ‘द गॉडफादर’ यांसारख्याही काही चित्रपटांची निर्मिती हॉलीवूडमध्ये करण्यात आली ज्यांनी या पारंपरिक चौकटी मोडून समाजातील विविध समस्या, काही क्रूर राज्यकर्त्यांनी केलेले अत्याचार, आदर्श व्यक्तींच्या यशोगाथा, गूढकथा, प्रेमकथा यांसारखे काही वेगळे विषय यशस्वीपणे हाताळले. अशाच काही अजरामर, लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘कॅसाब्लांका’ या चित्रपटाने नुकतीच आपली पंच्याहत्तरी साजरी केली.

‘हिस्ट्री’ वाहिनीच्या अधिकृत ट्विटर पेजवरून ‘कॅसाब्लांका’ या चित्रपटाने ७५ वर्षांचा टप्पा ओलांडल्याबद्दल शुभेच्छा देणारी एक चित्रफित अपलोड करण्यात आली. पुढे काही क्षणात लाखो लोकांनी या चित्रपटासंदर्भात आपापल्या आठवणी समाजमाध्यमांवर जागृत करण्यास सुरुवात केली. तसेच काहींनी तर चित्रपटातील गाजलेल्या संवादांचे व्हिडीओ देखील व्हायरल केले. यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

२६ नोव्हेंबर १९४२ साली ‘कॅसाब्लांका’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तीन ऑस्कर पुरस्कार पटकवणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन मायकेल कर्टिस यांनी केले होते. अमेरिकन अभिनेता हम्फ्री बोगार्ट व इंग्रिड बर्गमॅन या दोघांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर घडणारी ही ‘रिक’ आणि ‘इल्सा’च्या प्रेमाची कथा आहे. कुठल्याशा कारणाने एकमेकांपासून विलग झालेले हे जोडपे अनेक वर्षांनंतर अपघाताने पुन्हा एकदा एकमेकांसमोर येते. दरम्यान दोघांच्याही आयुष्यात अनेक बदल झालेले असतात. नायिकेचे लग्न होते तर नायक आपल्या व्यवसायात मग्न होतो. दीर्घ काळानंतर एकमेकांसमोर आलेले नायक नायिका पुन्हा एकदा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि शेवटी पुन्हा एकदा एकमेकांपासून विलग होतात. जगभरात कुठेही जेव्हा सर्वोत्कृष्ट प्रेमपटांवर चर्चा होते त्यात ‘कॅसाब्लांका’चे नाव आल्याशिवाय विषय पूर्णच होऊ शकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 2:29 am

Web Title: casablanca movie celebrates its 75th anniversary hollywood katta part 73
टॅग : Hollywood Katta
Next Stories
1 नृत्यबिजली
2 सरकार फक्त बघ्याचीच भूमिका घेणार का?
3 कॉमिक युध्दाचे वारे..
Just Now!
X