News Flash

सलमान, बिग बॉस निर्मात्यांविरुद्ध खटला

धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अभिनेता सलमान खान आणि बिग बॉस-७ या दूरचित्रवाणीवरील रिअ‍ॅलिटी शोच्या निर्मात्यांविरोधात पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदविला आहे.

| December 21, 2013 01:34 am

धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अभिनेता सलमान खान आणि बिग बॉस-७ या दूरचित्रवाणीवरील रिअ‍ॅलिटी शोच्या निर्मात्यांविरोधात पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदविला आहे.सदर शोमुळे मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने सलमान खान आणि निर्मात्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी मोहम्मद फसीहुद्दीन या उद्योगपतीने दंडाधिकाऱ्यांसमोर केली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही १३ डिसेंबर रोजी एफआयआर नोंदविला आहे, आम्हाला तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज असून पुढील कारवाईसाठी पुरावेही गोळा करावे लागणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या शोमध्ये सलमान खान याने जे हावभाव केले आहेत ते आक्षेपार्ह आहेत, असे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 1:34 am

Web Title: case against salman khan bigg boss producers for hurting sentiments
टॅग : Salman Khan
Next Stories
1 ‘आपल्या कलेचा डांगोरा आपणच पिटण्याचे युग’
2 ‘धूम ३’ का बघावा याची पाच कारणे..
3 ‘धूम ३’ चा धूमधडाका
Just Now!
X