दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि अभिनेता अमेय वाघ यांनी सुरू केलेल्या कास्टिंग काऊच या वेबमालिकेचा सातवा भाग नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी काऊचची स्पेशल गेस्ट होती सई ताम्हणकर. अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांनी विचारलेल्या तिरकस प्रश्नांना तिने फार कल्पक उत्तरं दिली. आतापर्यंत प्रत्येक अभिनेत्री एपिसोडच्या शेवटी रागाने निघून जाते. पण यावेळी मात्र अमेय आणि निपुणलाच सईला जाण्यासाठी सांगावे लागले.
यात मधेच अमेयचीही खिल्ली उडवली गेली आहे. या खिल्लीतून इतका हशा पिटला की तो शॉट कट करून नंतर दुसरा शॉट त्याला जोडला. १२ ऑगस्टला सईचा व्हायझेड गा नवा सिनेमा प्रदर्शित होत आहे. याबाबदही या काऊचवर चर्चा करण्यात आली आहे.
सईच्या आतापर्यंतच्या सिनेमांची निवड, कमी कपड्यातली सई अनेक खुमासदार प्रश्न विचारून या एपिसोडमध्ये अमेय आणि निपूण या जोडगोळीने धम्माल उडवून दिली आहे.
मराठी सिनेअभिनेत्रींना घेऊन भारतीय डिजिटल पार्टीने ही वेब सिरीज सुरू केली आहे. यामध्ये राधिका आपटे, प्रिया बापट, रिमा लागू, सई गोखले, स्वानंदी टिकेकर, पूर्वा ठोंबरे, सैराटची संपूर्ण टीम आली होती.
या वेब सिरिजमध्ये सध्याचे ट्रेंडिंग विषय आणि त्यावेळी चर्चेत असलेल्या व्यक्तीला गेस्ट म्हणून बोलावले जाते. भारतीय डिजिटल पार्टी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. मग वाट कसली बघताय आताच पाहा हा खुमासदार व्हिडिओ…
संग्रहित लेख, दिनांक 28th Jul 2016 रोजी प्रकाशित
कास्टिंग काऊचची शिकार सई ताम्हणकर
अमेय आणि निपुणनेच सईला जाण्यासाठी सांगितले
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-07-2016 at 19:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Casting couch with amey and nipun with sai tamhankar episode