25 November 2020

News Flash

रियाला सुशांतसोबत बघितल्याचा दावा करणाऱ्या शेजाऱ्याला सीबीआयनं दिला इशारा

"खोटं बोलू नका"

रिया चक्रवर्ती (संग्रहित छायाचित्र/PTI)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआयकडून केली जात आहे. सुशांत प्रकरणाशी संबंधित व्यक्तीची सीबीआयकडून चौकशी केली जात असून, १३ जून रोजी रियाला सुशांतसोबत बघितल्याचा दावा करणाऱ्या रियाच्या शेजारी डिंपल थावणी यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. यामुळे सीबीआयनं त्यांना कडक इशारा दिला. या चौकशीबद्दल इंडिया टुडेनं वृत्त दिलं आहे.

१३ जून रोजी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूतसोबत बघितल्याचा दावा रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थावणी यांनी केला होता. यासंबंधी थावणी यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. रियाला सुशांतसोबत बघितल्याचं सांगणाऱ्या थावणी यांच्याकडून सीबीआयनं माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावर “आपण रिया सुशांत प्रत्यक्ष बघितलं नाही, दुसऱ्या व्यक्तीकडून ऐकलं,” असं उत्तर थावणी यांनी दिलं.

थावणी यांना सीबीआयनं काय प्रश्न विचारले?

सीबीआय-सुशांत रियाला घरी सोडत असताना तुम्ही बघितलं का?
डिंपल -नाही. कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीनं बघितलं.

सीबीआय-ती व्यक्ती कोण आहे? ती व्यक्ती समोर का येत नाही?
डिंपल-कारण ती व्यक्ती कन्फर्टेबल नाहीये.

सीबीआय-त्या व्यक्तीनं त्या दोघांना केव्हा बघितलं?
डिंपल-मला माहिती नाही.

सीबीआय-त्या व्यक्तीनं त्या दोघांना कुठे बघितलं?
डिंपल-मला माहिती नाही

डिंपल थावणी यांचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर सीबीआयनं त्यांना सक्त ताकीद दिली. स्वतःची खात्री झाल्याशिवाय किंवा खरं असल्याशिवाय काहीही बोलू नका, अशा शब्दात सीबीआयनं डिंपल यांना इशारा दिला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयानं हा तपास सीबीआयकडं सोपवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2020 9:15 am

Web Title: cbi warns rhea chakrabortys neighbour who claimed she saw her with sushant bmh 90
Next Stories
1 करोनाचा रानू मंडललाही फटका, लॉकडाउनमुळे…
2 “आरे कारशेड सर्व मुंबईकरांची समस्या नाही”; कंगना रणौतचा उद्धव ठाकरेंना टोला
3 “अतिरिक्त खर्च किती असेल?”; मुख्यमंत्र्यांच्या मेट्रो कारशेड घोषणेवर सुमित राघवनचा सवाल
Just Now!
X