20 October 2020

News Flash

Happy Birthday Mithun Chakroborty : असा ‘डिस्को डान्सर’ होणे नाही

मिथुन चक्रवर्ती यांनी ख-या अर्थाने त्याकाळातील चित्रपटसृष्‍टीतील नायकाच्‍या भूमिकेची प्रतिमाच बदलून टाकली.

मिथुन चक्रवर्ती

१९७६मध्ये चित्रपटसृष्टीत एका उंच, सावळ्या आणि देखण्या कलाकाराने प्रवेश केला. मिथुन चक्रवर्ती यांनी ख-या अर्थाने त्याकाळातील चित्रपटसृष्‍टीतील नायकाच्‍या भूमिकेची प्रतिमाच बदलून टाकली. त्‍यांनी स्‍वत:च एकदा कबूल केले की, ‘अभिनेता बनण्‍याची माझी महत्‍त्‍वाकांक्षा नव्‍हती, पण बळेच मी या क्षेत्रात आलो’. मिथुन यांचे बॉलिवूडमधील करिअर एखाद्या चमत्‍कारापेक्षा कमी नाही. एक ज्‍युनिअर आर्टिस्‍ट ते एक
राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेता अभिनेता व एक सुपरस्‍टार, मिथुनदांचे जीवन ब-याचजणांकरिता प्रेरणादायी आहे. त्याकाळी इतरांहून वेगळे ठरवणारी त्यांची विशेषता म्‍हणजे त्‍यांचा लूक, वेगळ्या पण ट्रेंड स्‍थापित करणा-या डान्‍स मूव्‍ह्ज आणि कलात्मक सिनेमे व व्‍यावसायिक सिनेमे अशा दोन्ही ठिकाणी उत्‍कृष्‍ट काम करण्‍याची त्‍यांची लकब.

बॉलिवूडच्या या डिस्‍को डान्‍सरच्या ६८वा वाढदिवसानिमित्त ‘स्‍वर्ग से सुंदर’ हा १९८६ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट कौटुंबिक चित्रपट सोनी मॅक्‍स २वर सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.

‘स्‍वर्ग से सुंदर’ या चित्रपटात विजय (जितेंद्र) हा गावचा सरपंच आणि त्‍याचा लहान भाऊ रवी (मिथुन चक्रवर्ती) या दोन भावांची कथा आहे. रवी आपल्‍या आईवडिलांपेक्षाही आपला भाऊ व वहिनी लक्ष्मी (जयाप्रदा)वर प्रेम करतो आणि त्‍यांचा आदर करतो. गावामध्‍ये सर्वजण त्‍यांच्‍या कुटुंबाकडे सुखी कुटुंब म्‍हणून पाहतात. विजयचा प्रतिस्‍पर्धी मिलावटराम (कादर खान)ची मुलगी ललिता (पद्मिनी कोल्‍हापुरे)वर रवीचे प्रेम असते. तिच्‍याशी लग्‍न केल्‍यानंतर मात्र सगळं चित्र पालटतं. ललि‍ता व लक्ष्‍मी एकाच वेळी गरोदर राहतात, पण हा आनंद काही काळापुरताच असतो. ललिताचे मूल जन्‍माच्‍या वेळी मृत्‍यू पावते, तर लक्ष्‍मीला मुलगा होतो. लक्ष्‍मी आणि विजय आपले मूल ललिता व रवीला द्यायचे ठरवतात. तथापि, येथेच कहाणी नकारात्‍मक वळण घेऊ लागते. ज्‍या मुलाने कौटुंबिक बंध घट्ट केले पाहिजेत, तो कौटुंबिक कलहाचे कारण बनतो. रवी कुटुंबाला एकत्र आणू शकेल का की, द्वेषाच्‍या भाराखाली तो दबून जाईल? हे या चित्रपटाच्या कथेतून उलगडते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 9:00 am

Web Title: celebrates disco dancer mithun chakroborty birthday with his superhit movie swarg se sundar
Next Stories
1 Gold Movie Teaser : अन् त्यांच्या प्रयत्नाने ब्रिटीशही भारतीय राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहू लागले
2 ‘थोडा रहम कर लो’, ‘रेस ३’ पाहिल्यावर सोशल मीडियावर हास्यकल्लोळ
3 Big Boss Marathi: कोण होणार नवा कॅप्टन
Just Now!
X