नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. बंगळुरुतील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी ट्विटवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनी कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘व्रतस्थ रंगकर्मी’ म्हटले आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांनी कर्नाड यांचे योगदान कायमच स्मरणात राहिल अशा शब्दामध्ये श्रद्धांजली अर्पण केली आहे. जाणून घेऊयात कोण काय म्हणाले आहे कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पण करताना…

कर्नाड म्हणजे व्रतस्थ रंगकर्मी: नाना पाटेकर (अभिनेते)

तुमची शिकवण कायम माझ्यासोबत राहिल: सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री)

त्यांचे योगदान कायमच लक्षात राहिल: एच. डी. कुमारस्वामी (मुख्यमंत्री, कर्नाटक)

एक महान लेखक हरपला: जिग्नेश मेवाणी

आत्म्याला शांती लाभो: सिद्धार्थ (दाक्षिणात्य अभिनेता)

माझ्यावर त्यांचा प्रभाव: राकेश शर्मा (सिनेनिर्माता)

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो: एस. एस. कीम (अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा)

माझा आवडता अभिनेता गेला: सत्यजीत तांबे (अध्यक्ष, महाराष्ट्र युथ काँग्रेस)

कर्नाड यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ (२००५) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (२००९), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (१९७२), काडू (१९७४), ओन्दानुंडू कालाडल्ली (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते.