05 December 2020

News Flash

लॉकडाउनमुळे अभिनेत्री झाली बेरोजगार; घरभाडं द्यायलाही उरले नाहीत पैसे

लॉकडाउनमुळे अभिनेत्रीवर कोसळलं आर्थिक संकट

वाढत्या लॉकडाउनमुळे सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोजगार गेल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. या लॉकडाउनमध्ये आता कलाकारही होरपळू लागले आहेत. दरम्यान अभिनेत्री चाहत पांडे हिने घराचं थकलेलं भाडं देण्यासाठी तरी पैसे द्या अशी विनंती निर्मात्यांना केली आहे.

अवश्य पाहा – ‘महाभारता’मध्ये या WWE सुपरस्टारने साकारलेली ‘भीम’ ही व्यक्तिरेखा

‘हमारी बहू सिल्क’ या टीव्ही मालिकेमुळे नावारुपास आलेली चाहत पांडे सध्या आर्थिक समस्येमुळे त्रस्त आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या समस्या सांगितल्या. ती म्हणाली, “मी एका प्रसिद्ध टीव्ही मालिकेमधील मुख्य अभिनेत्री आहे. परंतु माझ्या बचत खात्यात आता एक रुपया सुद्धा उरला नाही. माझे सर्व पैसे रोजचा प्रवास आणि खाण्यापिण्यामुळे संपले आहेत. निर्मात्यांनी मला माझ्या कामाचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून माझं घर भाडं थकलं आहे. घर मालकाने मला घराबाहेर काढण्याची धमकी दिली आहे. अशा करोनाग्रस्त वातावरणात जर त्यांनी मला घराबाहेर काढलं तर मी कुठे जाणार मला माहित नाही. मला आर्थिक मदतीची गरज आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत निर्माते मात्र उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत.” असं चाहत म्हणाली.

अवश्य पाहा – विकासचा छोटा भाऊही आला; ‘आत्मनिर्भर’वरून अभिनेत्याचा मोदींना टोला

चाहत एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. सध्या ती ‘हमारी बहू सिल्क’ या मालिकेमध्ये काम करत आहे. या मालिकेत ती मुख्य व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. परंतु निर्मात्यांनी पैसे न दिल्यामुळे तिच्यावर आर्थिक समस्येचा डोंगर कोसळला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 2:48 pm

Web Title: chahat pandey says she was asked to vacate home for not paying rent mppg 94
Next Stories
1 “मी गरीबांची अँजेलिना जोली नाही”; अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
2 “ही घटना पाहतोय हेच आपलं दुर्दैव”; अम्फन चक्रीवादळामुळे आयुषमान झाला दु:खी
3 मोहनलाल यांनी वाढदिवशी प्रेक्षकांना दिली भेट, ‘दृश्यम २’चा टीझर प्रदर्शित!
Just Now!
X