बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. चालू घडामोडींवर भाष्य करण्यासाठी ते ट्विटरवर आपली मतं सतत मांडत असतात. आता भारतीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना पाकिस्तानसोबत खेळणार याचा आनंद त्यांनी ट्विटरवरून शेअर केला. पण त्यांचा हा आनंद त्यांच्यावर रोष पत्करवणारा ठरेल याची त्यांना कल्पनाही नव्हती.

मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

१४ जूनला त्यांनी पाकिस्तानला डिवचणारे ट्विट केले होते. ‘पाकिस्तान तुम्ही अंतिम फेरीत पोहोचलात यासाठी तुमचे अभिनंदन.’ नंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या जर्सीच्या रंगांचा उल्लेख करत म्हटले की, ‘आता भारताकडून हरायला तयार व्हा.’ या ट्विटवरुन पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी ऋषी यांना चांगलेच सुनावले होते. पण आता ही चर्चा शांत होते न होते तोच ऋषी यांनी अजून एक ट्विट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उद्देशून केले आहे. ‘पाकिस्तान बोर्डाने यावेळी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना पाठवावे. गेल्यावेळी हॉकी किंवा खो-खो खेळणारे खेळाडू पाठवले होते. कारण १८ जूनला (फादर्स डे) ते बापासोबत खेळणार आहेत.’

ऋषी यांच्या या ट्विटनंतर भारतीय चाहते आणि पाकिस्तानी चाहते यांच्यामध्ये ट्विटर वॉरच सुरू झाले. मधीहा अन्वरने लिहिले की, ‘तुमच्यासारख्या अभिनेत्याकडून नम्रपणा आणि परिपक्वतेची अपेक्षा होती. पण, आता असं वाटतंय की तुमच्याकडून थोडी जास्तच अपेक्षा केली गेली.’

यावर उत्तर देताना कपूर म्हणाले की, ‘तुम्ही मुख्य मुद्यावरुन विचलीत का होता. माझ्यासाठी क्रिकेट ही फार मोठी गोष्ट आहे. यावरच आपण बोलूया.. तुम्ही विषयांतर करु नका. मला आणि माझ्या देशाला हे पूर्णपणे माहितीये की मी कोण आहे.’ एवढंच बोलून ऋषी थांबले नाहीत, तर इंग्रजीची एक म्हण ट्विट करत म्हटले की, हे इंग्रजी आहे.. तुम्हा मुर्खांना इंग्रजी काय कळणार.’

दिशा पटानीचा हॉट लूकमधील फोटो पाहिला का?

यानंतर वाढत जाणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये ऋषी यांनी अजून एक ट्विट करत म्हटले की, ‘सोडा हा विषय. तुम्ही जिंका आणि १००० वेळा जिंका पण फक्त दहशकवाद बंद करा. मला हरणं मान्य आहे. आम्हाला शांती आणि प्रेम हवंय.’