अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सध्या सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण याविषयीच चर्चा करत आहेत. यात प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे सध्या चेतन भगत यांच्या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे.

चेतन भगत यांनी ट्विट करुन देशातील जनतेचं अभिनंदन केलं आहे. त्यासोबच प्रभू रामचंद्रांच्या कृपेमुळे देशात शांतता आणि आनंद नांदू दे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

“आयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माणाचं भूमिपूजन होत आहे. या शुभप्रसंगी संपूर्ण देशातील नागरिकांचं मनापासून अभिनंदन. श्री रामांच्या कृपेमुळे देशात प्रेम, सद्धभावना, औदार्य, साहस, शांती, प्रगती, बंधुभाव, समृद्धी या सगळ्य गोष्टी अखंड राहो”, असं ट्विट चेतन भगत यांनी केलं आहे.


दरम्यान, चेतन भगत यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चिलं जात आहे. त्याच्याप्रमाणेच बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच देशातील जनतेचं अभिनंदन केलं आहे.