लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ या मराठी चित्रपटात स्वराज्यातील पहिला ‘सर्जिकल स्ट्राइक’ पहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित असलेला हा चित्रपट १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून प्रेक्षकांकडून त्याला दाद देखील मिळाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अविस्मरणीय किस्सा चिन्मयने सांगितला आहे.

“फत्तेशिकस्त चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान खूप महत्वाच्या गोष्टी घडल्या. त्यातली अविस्मरणीय गोष्ट म्हणजे आम्ही राजगडावर केलेलं शूटिंग. राजगडावर एक नेढे आहे, त्या नेढ्यात बसून आम्ही एक सीन केला होता. खूप उंचावर डोंगराच्या मधोमध आपोआप झालेलं एक भगदाड आहे ते. मला उंच ठिकाणांची भीती आहे. पण आम्ही तिथे जेव्हा शूटिंग केलं तेव्हा माझी संपूर्ण भीती निघून गेली. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. अजून एक म्हणजे मोहिमेवर निघण्याआधी माझं एक भाषण आहे. ते दिग्पालने ऐनवेळी बदललं. आधीचं भाषण त्याला फारसं आवडलं नव्हतं. त्याने नंतर लिहलेलं भाषण फारच सुंदर होतं. क्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला इतकं सुंदर भाषण सिनेमामध्ये करण्याची संधी येते. त्याने ज्या कागदावर मला ते भाषण लिहून दिल होतं त्यावर मी त्याची सही घेतली होती. अजूनही तो कागद मी जपून ठेवलेला आहे. शूटिंग दरम्यान माझ्या खांद्याला दुखापतसुद्धा झाली होती पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असल्यामुळे कायम उत्साह होता,” असं त्याने सांगितलं.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी कशी तयारी केली याबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला, “फत्तेशिकस्त सिनेमामध्ये भरपूर साहसदृश्ये आहेत, घोडेस्वारी आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची जोरदार तयारी करावी लागली. आम्ही संपूर्ण सिनेमा खऱ्या खुऱ्या ठिकाणी शूट केलेला आहे. राजगडावर आम्ही भरपूर शूटिंग केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी खूपच आवाहनात्मक होत्या त्यामुळे त्याची मानसिक तयारी करावी लागली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडे एवढे शूरवीर सरदार असताना एवढ्या जोखमीची मोहीम का केली? असा एक प्रश्न माझ्या पुढे उभा ठाकला होता. त्यामुळे भरपूर वाचन करावं लागलं. शामराव जोशी यांची यात खूप मदत झाली. शारीरिक व मानसिक, दोन्ही प्रकारची तयारी फत्तेशिकस्तच्या वेळेस करावी लागली.”