News Flash

अभिनेत्रीनं स्विकारलं गुलाबजाम करण्याचं आव्हान; भारतीयांकडे मागितल्या टिप्स

कसा तयार करतात गुलाबजामून?

गुलाबजाम म्हटलं की कुणाही भारतीय माणसाच्या तोंडाला पाणी सुटतं. गुलाबजाम ही भारतातील सर्वात लोकप्रिय मिठाई म्हणून ओळखली जाते. ही मिठाई खाण्यास जितकी मजेदार वाटते, तितकीच तयार करण्यास कठीण असते. ‘गुलाबजाम’ बनवणे ही एक कला आहे, असेही काही जण म्हणतात. मात्र आता ही मिठाई तयार करण्याचे आव्हान अभिनेत्री ख्रिस टायगेन हिने स्विकारले आहे.

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ख्रिस टायगेन हिला गुलाबजाम फार आवडतात. अलिकडेच तिला एका चाहत्याने गुलाबजामून तयार करण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान ख्रिसने स्विकारले आहे. “उद्या मी माझ्या आयुष्यातील पहिला गुलाबजाम तयार करणार आहे. मी खूप उत्सुक आहे. त्यासाठी कृपया मला टिप्स द्या.” असे ट्विट करुन ख्रिसने गुलाबजाम तयार करण्याची घोषणा केली आहे.

तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. दरम्यान तिला भारतीय नेटकऱ्यांनी गुलाबजाम तयार करण्यासाठी टिप्स देण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 4:07 pm

Web Title: chrissy teigen wants tips on how to make the perfect gulab jamun mppg 94
Next Stories
1 ही तर हद्दच झाली! Eros बनवणार ‘करोना प्यार है’ चित्रपट
2 डार्लिंग डीन आणि डॉक्टर डॉन जाणार समुद्रापार अलिबागला
3 इथून झाली प्रेमाची सुरुवात…अलका कुबल यांनी पोस्ट केला पतीसोबतचा सुंदर फोटो
Just Now!
X