News Flash

या चित्रपटातून चंकी पांडे करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील करणार आहेत

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरुन हसवणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे चंकी पांडे. चंकी पांडेच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण आता चंकी पांडेचे हे विनोद मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. मराठी प्रेक्षकांसाठी हा सुखद धक्काच आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चंकी पांडे दिग्दर्शक समीर पाटील यांच्या ‘विकून टाक’ या चित्रपटात काम करणार आहे. पण या चित्रपटात तो कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही. ‘मराठी चित्रपटात काम करणे हे माझ्या बकेट लिस्टमध्ये होते. मी प्रादेशिक भाषा, बंगाली आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण मला मराठी चित्रपटामध्ये काम करायचे होते. कारण मला असे वाटते की मराठी भाषेत सर्वात चांगले विनोदी चित्रपट होऊ शकतात. तसेच “घेऊन टाक” हे माझे आवडते मराठी वाक्य आहे आणि विकून टाक हे थोडे फार त्याच्या सारखेच आहे. आणखी खूप कारणे आहेत हा चित्रपट करण्याची’ असे चंकी चित्रपटाबाबत बोलताना म्हणाला आहे.

तसेच या धाटणीचा चित्रपट पहिल्यांदाच करत असल्याचे देखील चंकी पांडेने म्हटले आहे. ‘हा चित्रपट भारतातील ग्रामीण भागावर आधारित आहे आणि चित्रपटाचे चित्रीकरण हे महाराष्ट्रातील एक गावामध्ये होणार आहे. हा चित्रपट सोशल कॉमेडी आहे आणि असा चित्रपट मी या आधी केलेला नाही’ असे चंकी पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 12:46 pm

Web Title: chunky pandey marathi movie debut avb 95
Next Stories
1 “इस बार सामने गब्बर हो या शाकाल हम भी देखेंगे”; बिग बींच्या पोस्टवर अनुरागची प्रतिक्रिया
2 संघाच्या नावाने खडे फोडणं थांबवा; केआरकेचं मुस्लिमांना आवाहन
3 वडील-मुलीचं नातं समृद्ध करणारी ‘वेगळी वाट’
Just Now!
X