News Flash

‘या’ मालिकेतून दया येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

खुद्द दयाने याबाबत माहिती दिली आहे.

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेली मालिका म्हणजे ‘सीआयडी.’ या मालिकेने लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत अनेकांची मने जिकंली होती. मालिकेतील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे घराघरात पोहोचली होती. २०१८मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण मालिकेतील ‘दया दरवाजा तोडदे’ हा डायलॉग आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असल्याचे दिसत आहे. आता हा दया पुन्हा एकदा एका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता दयानंद शेट्टी ‘सावधन इंडिया’ या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. दयाला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते आनंदी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘सावधन इंडिया’ ही मालिका चर्चेत आहे. या मालिकेमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. आता दया या शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

जाणून घ्या : CID मधील दया सध्या काय करतो?

दया सोबत या मालिकेत अंकुर नय्यर आणि मानिनी मिश्रा हे कलाकार देखील पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता मालिकेच्या निर्मात्यांनी सूत्रसंचालना करता दयाची निवड केली आहे. दयानंदने अमर उजालाला याबाबत माहिती दिली आहे. ‘हो. मी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी पहिल्यांदाच एका शोचे सूत्रसंचालन करणार आहे. एक सूत्रसंचालक म्हणून सावधना इंडिया मालिकेत काम करताना मला आनंद होत आहे’ असे त्याने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 7:36 pm

Web Title: cid fame dayanand shetty is all set to make a comeback avb 95
Next Stories
1 सनीने सांगितला तिचा फॅशन मंत्र
2 माझा पगार ऐकून सलमान सरांना धक्काच बसला, मग…
3 ‘तुझं माझं जमतंय’फेम रोशन विचारेची सोशल मीडियावर चर्चा
Just Now!
X