News Flash

सिने ‘नॉलेज’: ‘बॉक्सर’मध्ये मिथुनला कोणी दिली होती फाइट?

घड्याळ चोरल्याच्या आरोपाखाली त्याला सहा महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते.

बॉक्सर या १९८४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन राज एन सिप्पी यांनी केले होते.

मनोरंजन…. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीशी उसंत मिळाल्यावर अनेकांचं मन रुळवणारा एक घटक. मनोरंजनाच्या विविध साधनांना आणि माध्यमांना प्रत्येकाची पसंती असते. त्यातीलच एक माध्यम म्हणजे चित्रपट. बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंतच्या जवळपास अनेक चित्रपटांचे लाखो-करोडो रसिक स्वत:ला कट्टर चित्रपटप्रेमी म्हणवतात. अनेकजण तर त्यांचा हा स्वघोषित कट्टरपणा सिद्धही करतात. चित्रपटाच्या संवादांपासून ते अगदी लहानातल्या लहान व्यक्तिरेखेपर्यंतची माहिती ठेवणाऱ्या या चाहत्यांचे कधीकधी कलाकारांनाही कुतुहल वाटते. तुम्हालाही जर स्वत:ला चित्रपटांबद्दल विलक्षण प्रेम वाटत असेल, तर चला, सिने नॉलेजच्या या गुंतागुंतीच्या एका प्रश्नाचं उत्तर देत सिद्ध करा तुमचं रसिकत्व..

बॉक्सर या १९८४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन राज एन सिप्पी यांनी केले होते. यात मिथुन चक्रवर्ती, डॅनी डेनझोन्गपा, तनुजा, रती अग्निहोत्री, शरत सक्सेना, सुजित कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट सिल्वेस्टर स्टॅलोनच्या रॉकी सिरीजवरून बनविण्यात आला होता.

काय होती चित्रपटाची कथा
धर्मा हा कश्मिर सिल्क मिल्समधून खेळणार बॉक्सर असतो. या मिलचा व्यवस्थापकीय संचालक धर्माच्या कामाने खूप खूश असतो. तो धर्माला खात्री देतो की, जर तू शेराविरुद्धचा बॉक्सिंगचा सामना जिंकलास तर मी तुला लंडनला पाठवेन. दुर्दैवाने, धर्मा तो सामना हरतो. तसेच, या सामन्यात तो गंभीर जखमी झाल्यामुळे भविष्यात त्याला बॉक्सिंग खेळता येणे शक्य नसते. या घटनेमुळे दुःखी झालेला धर्मा दारुच्या अधीन होतो. दारुच्या नशेत तो त्याची पत्नी सावित्री आणि मुलगा शंकर यांच्याकडे दुर्लक्ष करतो. सावित्रीने दुस-या मुलाला जन्म दिल्यानंतर तर त्यांची परिस्थिती आणखी बिकट होते. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी शंकर चो-या करण्यास सुरुवात करतो. पुढे मोठा झालेला शंकर गुन्हेगारी जगताकडे वळतो. त्यानंतर एका दागिन्याच्या दुकानातून घड्याळ चोरल्याच्या आरोपाखाली त्याला सहा महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. तेथे त्याची परिक्षित साहनी या बॉक्सिंग मॅनेजरशी ओळख होते. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर परिक्षित हा शंकरला बॉक्सिंगचे प्रशिक्षण देऊन चॅम्पियन रघु राजच्या विरोधात उभा करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 1:05 am

Web Title: cine quiz who is the oppenent boxer of mithun in boxer movie
Next Stories
1 ‘हरामखोर’साठी नवाजुद्दीनने केवळ १ रुपया घेण्यामागचे कारण..
2 Amaal Mallik : चित्रपट पुरस्कारांमधील पक्षपातीपणावर अमाल भडकला
3 ९ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर परतणार ही प्रसिद्ध खलनायिका
Just Now!
X