28 February 2021

News Flash

Video : ‘कॉलेज डायरी’ची उलगडणार पानं

हा चित्रपट १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

'कॉलेज डायरी'

हळुवार स्वप्नांची नशा, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द, आत्मविकासाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं एक संपूर्ण प्रकरण म्हणजे ‘कॉलेज डायरी’. भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत ‘कॉलेज डायरी’ची पानं लवकरच उलगडणार असून केवळ धमाल-मजा-मस्ती यांवर भाष्य करणारा नव्हे तर कॉलेजविश्वात घडणाऱ्या अनुचित घटनांचा मागोवा घेणाऱ्या ‘कॉलेज डायरी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित ‘कॉलेज डायरी’ हा चित्रपट १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘कॉलेज डायरी’ची कथा ही कॅम्पसमध्ये घडते. कॉलेज म्हणजे केवळ मजा-मस्ती-धम्माल असे मानणाऱ्या काही मित्रांच्या आयुष्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांभोवती फेर धरणारी अनिकेत जगन्नाथ घाडगे याची कथा खिळवून ठेवणारी आहे. संवाद अनिकेत जगन्नाथ घाडगे आणि विशाल सांगले यांचे आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दूबाले पाटील असून या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, शुभम राऊत, शिवराज चव्हाण, प्रतीक गंधे, हेमलता रघू, जनार्दन कदम आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. मराठी सिनेसंगीतक्षेत्रात नवा विक्रम करणारा ‘कॉलेज डायरी’ पाच भाषांतील गाण्यांमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे.

वाचा : ‘अश्रूंची झाली फुले’ सुबोध आणणार पुन्हा एकदा रंगमंचावर 

रोमांचकारी घटनाक्रमांचा चढता-उतरता आलेख दाखविणारा ‘कॉलेज डायरी’च्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 4:04 pm

Web Title: college diary trailer released aniket jagannath ghadage film is high on action
Next Stories
1 ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’मध्ये नवाजुद्दीनने सांगितला वॉचमन ते अॅक्टरचा प्रवास
2 ‘सिम्बा’ची परदेशातही गाडी सुसाट , १०० कोटींपासून काही पावलं दूर
3 गर्दीत एकाने मला नको त्या ठिकाणी चिमटा काढला-कंगना राणावत
Just Now!
X