News Flash

Big Boss Marathi: …म्हणून नंदकुमारला पुष्करने विचारला जाब

घरामध्ये आऊंशी कोणीही उद्धटपणे वागलेले मी खपवून घेणार नाही, कारण त्या मला आईसारख्या आहेत

काल नंदकिशोर, भूषण, त्यागराज आणि उषा नाडकर्णी यांच्यामध्ये बराच वेळ संभाषण रंगले आणि नंतर त्याचे रुपांतर वादामध्ये झाले. आजदेखील पुष्कर आणि नंदकिशोर मध्ये चांगलेच भांडण झाल्याचे पाहायला मिळणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या वाईल्ड कार्ड एण्ट्री घरातील स्पर्धकांना न पटल्याचे त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवले आहे.

परंतु, नंदकिशोर चौघुलेला असलेला अती- आत्मविश्वास आता हळूहळू दिसून येत आहे. ५० दिवसांनंतर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेल्या नंदकिशोरने सगळ्या सदस्यांबद्दल बरीच माहिती घेऊन आल्याचा दावा तर केलाच. पण, त्याची ही वागणूक घरामध्ये त्याच्या बाजूने जाणार की विरोधात जाणार हे येत्या दिवसांमध्ये कळेलच.

आजदेखील नंदकिशोरचे पुष्कर मेघा, शर्मिष्ठा आणि सईमध्ये बराच वाद होताना दिसणार आहे. नंदकिशोरची अरेरावीची भाषा आणि स्त्रीप्रती असलेली वर्तणूक बरोबर नाही याची जाणीव मेघा, शर्मिष्ठा आणि सई त्याला करून देताना दिसणार आहेत. तसेच पुष्करचा राग देखील आज अनावर होणार आहे.

नंदकिशोरचे आऊंना वारंवार बोलणे बरोबर नाही, याची जाणीव पुष्कर त्याला करुन देतो. या दरम्यान त्यांच्यात वादावादी होणार आहे. ‘घरामध्ये आऊंशी कोणीही उद्धटपणे वागलेले मी खपवून घेणार नाही, कारण त्या मला आईसारख्या आहेत,’ असे पुष्कर नंदकिशोरला बजावून सांगताना दिसणार आहे.

परंतू या सगळ्यामध्ये नंदकिशोरचा काही वेगळाच हेतू असल्याचे तो भूषणला सांगतो. नेमका त्याचा काय हेतू आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 8:07 pm

Web Title: colors marathi reality show big boss fight between pushkar jog and nandkishor chaughule
Next Stories
1 Photos: दीपिका- रणवीरने सुरू केली लग्नाची खरेदी
2 सलमानचे संपूर्ण कुटुंब आहे या क्रिकेटपटूचे वेडे
3 Top 5: बॉलिवूडचे हे कोट्याधीश स्टार आजही वापरतात स्वस्त गाडी
Just Now!
X