08 March 2021

News Flash

भोसले वाड्यात निर्मला आणणार भूत!

स्नेहा नामक भुताचा वावर संपूर्ण वाड्यात आहे

कलर्स मराठी मालिका 'चाहूल'

‘चाहूल’ मालिकेमध्ये सध्या बऱ्याच अघटित गोष्टींची चाहूल भोसलेकरांना जाणवत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शांभवी आणि सर्जामध्ये मैत्रीच्या नव्या नात्याला सुरुवात झाली. शांभवीला लहानपणापासून एक दैवी देणगी आहे आणि त्याचाच फायदा वाड्यातील अनेक रहस्य सोडविण्यासाठी शांभवीला होत आहे. शांभवीला अमानवी शक्ती, आत्मा आणि अघटित गोष्टींची चाहूल लागते, तिला तिच्या जवळपास असलेल्या या सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे वाड्यातील अशाच अमानवी, अघटित गोष्टींचं रहस्य शांभवीला हळूहळू कळतं आहे. येत्या आठवड्यामध्ये भोसले वाड्यात स्नेहा नामक भुताची एन्ट्री होणार आहे. हे भूत शांभवीच्या मार्गात कोणते अडथळे निर्माण करणार? हे पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.

शांभवीला भोसले वाड्यामध्ये असलेल्या भुताची चाहूल लागली आहे आणि ती त्या भुताच्या मागावर आहे. निर्मलाला मात्र या सगळ्या प्रकरणामुळे सर्जाला सत्य कळण्याची कुठे ना कुठे भीती लागून राहिली आहे. त्यामुळे निर्मलाने शांभवीला चकवा देण्यासाठी भोसले वाड्यामध्ये लहान भूत आणले आहे जिचे नाव स्नेहा आहे. शांभवी निर्मलाच्या या जाळ्यात अडकली. तिला वाटते आहे की वाड्यातील हे भूत आठ वर्षांची लहान मुलगी स्नेहाच आहे. या सगळ्यामुळे निर्मला खूश आहे कारण सगळया गोष्टी निर्मलाला हव्या तशा घडत आहेत.

हे वाड्यातील नवीन भूत वाड्यातील सगळ्यांनाच घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. स्नेहा नामक भुताचा वावर संपूर्ण वाड्यात आहे. सर्जापासून पासून सगळ्यांनाच आता भीती वाटू लागली आहे कि हे भूत कोणाच काही बरं वाईट तर करणार नाही ना? या सगळ्या गोष्टी होत असतानाच शांभवी या भूतावर कब्जा करते आणि तिच्या कडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते.

स्नेहा शांभवीला निर्मलाच सत्य सांगणार का? सर्जाला निर्मलाचे सत्य कळणार का? शांभवीला स्नेहाने सत्य सांगितलच तर पुढे काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी नक्की बघा चाहूलचा महासप्ताह ५ ते १५ एप्रिल रात्री १०.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 3:39 pm

Web Title: colors marathi serial chaahul on new track
Next Stories
1 वरुणचे ट्विटरला ‘बाय-बाय’
2 ‘नाम फाउंडेशन’तर्फे शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात
3 फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन ‘बिग बॉस कन्नड’ विजेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X