कलर्स मराठीवरील ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेमध्ये रमा आणि राजचे लग्न झाल्यापासून रमाला, कुलकर्णी घरातल्या सदस्यांचे विचार पटत नाही. रमा आजच्या काळातील मुलगी असल्यामुळे स्त्रीवर कुठल्याही प्रकारे होणारा अत्याचार तिला मान्य नाही. कुलकर्णींच्या घरातील चालीरीती आपल्याशा करणे, त्यांच्या नियमांना पाळणे, त्यांचा परंपरावाद समजून घेणे रमाला अवघड होऊन बसले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, तिला स्वत:ची मते आहेत, विचार आहेत ज्याला कुलकर्णी यांच्या घरात मुळीच स्थान नाही.

रमा आणि विभा, तसेच कुलकर्णी परिवार यांच्या विचारात असलेली तफावत खूपच मोठी असल्याने रमा या घरामध्ये राहण्यास तयार नव्हती आणि तिने राजला आपण वेगळे राहू असेदेखील सांगितले. परंतु यामध्ये विभा यांनीच सुवर्णमध्य काढला आणि रमा आणि राजला एक अट घातली. या अटीनुसार त्यांनी रमाला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. या अटीमुळे एकतर विभा तरी बदलतील अथवा रमा बदलेल.

विभाची ही दोन महिन्यांची अट रमाने स्वीकारली असून राजदेखील खूश आहे. परंतु घरामध्ये स्त्रियांप्रती असलेला पुरूषांचा आणि घरातीलच स्त्रियांचा दृष्टीकोन रमाला मान्य नाही असे दिसून येत आहे. या घरातील लोकांना त्यांच्या अनावश्यक नियमांना रमाने बदलण्याचा निश्चिय केला आहे. याच दरम्यान रमाची आई कुलकर्णी परिवाराकडून रमावर खूप अत्याचार होत आहेत, तिला स्वातंत्र्य नाही, तिच्यावर बळजबरी होत आहे, रमाला घरामध्ये डांबून ठेवले आहे, तिच्या वागण्यावर, बोलण्यावर आणि पोशाखावरदेखील बऱ्याच मर्यादा आहेत असे आरोप करते.

आईच्या या आरोपातून रमा विभा आणि संपूर्ण परिवाराला मिडीयासमोर वाचवते आणि असे काहीही तिच्यासोबत घरामध्ये घडत नसल्याचे सांगते. विभाताईंनासुध्दा बास्केटबॉल आवडतो आणि त्यांना याबद्दल माहिती आहे असेदेखील ती सगळ्यांना सांगते. सुरूवातीला कोणालाच विश्वास बसत नाही. मात्र विभा आपल्याला असलेली माहिती सर्वांसमोर मांडतात तेव्हा सगळ्यांना विश्वास बसतो आणि आश्चर्यदेखील वाटते.

आता अटीत असलेल्या या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कोण कोणाला बदलणार? रमा- राजच्या नात्याचे भविष्य काय असणार? त्यांच्या सहजीवनाला कुठली नवी कलाटणी मिळणार? हे पाहायला विसरू नका ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ मालिकामध्ये सोम ते शनि रात्री ८.०० वाजता फक्त कलर्स मराठीवर.