News Flash

कपिलच्या ‘बुआ’च्या पार्टीत घुसले चोर; पार्टीचा आनंद लुटल्यानंतर केली चोरी!

दोघांनी पार्टीचा पुरेपूर आनंद लुटत मद्यपान केले आणि संधी साधून चोरी केली.

कपिलच्या ‘बुआ’च्या पार्टीत घुसले चोर; पार्टीचा आनंद लुटल्यानंतर केली चोरी!
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मध्ये बुआची भूमिका साकारणारी अभिनेत्री उपासना सिंहच्या बर्थ डे पार्टीत चोरी झाल्याचे वृत्त आहे.

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये बुआची भूमिका साकारणारी अभिनेत्री उपासना सिंहच्या बर्थ डे पार्टीत चोरी झाल्याचे वृत्त आहे. ऐन पार्टीत काही चोर घुसले आणि त्यांनी आधी पार्टीचा पुरेपूर आनंद लुटला. त्यानंतर या पार्टीला आलेल्या एका मॉडेल आणि गायकाचं पाकिट घेऊन ते पळाल्याचं कळतं. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून याचे सर्व चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केले.

वाचा : एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण

वर्सोवा पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, २९ जूनला उपासना सिंहचा वाढदिवस होता. उपासनाने वर्सोवा येथील द व्यू थिएटर हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या पार्टीत उपस्थित असलेला गायक हॅप्पी रॉय आणि मॉडेल काया शर्मा यांच्या पर्स चोरीला गेल्या. या पर्समध्ये त्यांचे मोबाइल फोन, एटीएम कार्ड याच्यासहित जळपास वीस हजार रुपयांची रोख रक्कम होती. स्वतः उपासनानेच फोन करून या चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

वाचा : या अभिनेत्याच्या वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेली पत्नी-मुलीची हत्या

पांढऱ्या रंगाचे शर्ट घातलेला एक मुलगा चोरी केलेली बॅग घेऊन पार्टीतून बाहेर पडत असल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. त्याच्यासोबत आणखी एक मुलगा होता. या दोघांनी पार्टीचा पुरेपूर आनंद लुटत मद्यपान केले आणि संधी साधून चोरी केली. हे दोन्ही आरोपी पार्टीतून तर सहज निसटले. पण घटनास्थळापासूनच काही अंतरावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. हे पाहून ते दोघंही घाबरले आणि त्यांनी चोरीची पर्स रस्त्यावरच फेकून दिली. काही तासानंतर सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन्ही चोरांची ओळख पटली. त्यानंतर वर्सोवा पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी शुक्रवारी विरेंद्र आणि दीपक या दोघांना कलम ३८० (चोरी) अंतर्गत अटक केली. आज या दोघांनाही स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2017 4:22 pm

Web Title: comedy nights with kapil fame upasana singhs birthday party mystery man robs models bag
Next Stories
1 पुणेकरांनी तब्बूच्या चित्रपटाचे शूटिंग पाडले बंद
2 VIDEO : चंदन कपिलसमोर विमानातील ‘त्या’ वादाची आठवण काढतो तेव्हा…
3 एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणंही कठीण
Just Now!
X