प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती पुन्हा खालावली असून ते लाइफ सपोर्टवर आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र, अद्यापही त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे सध्या ते लाइफ सपोर्टवर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, आता बालसुब्रमण्यम यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. याविषयी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करत याविषयीची माहिती दिली.


“गेल्या २४ तासांमध्ये त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. म्हणूनच त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यता आलं आहे. तसंच तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत”, असं रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं.

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी एस. पी.बालसुब्रमण्यम यांना करोनाची बाधा झाली होती. त्यावेळी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली होती. आता त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं MGM रुग्णालयाने दिली आहे.