News Flash

चौथ्या क्रमांकासाठी अभिनेत्री स्पृहा जोशीने सुचवला पर्याय, बघा तुम्हाला पटतोय का?

सोशल मीडिया अकाऊंटवर सुचवला पर्याय

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या फलंदाजीच्या बाबतीत चांगलाच अडचणीत सापडला आहे. पहिले ४ सामने जिंकल्यानंतर भारताला अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कडवी झुंज मिळाली. शिखर धवन दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर, संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये. शिखरच्या अनुपस्थितीत विजय शंकरला संघात जागा देण्यात आली, मात्र त्यालाही आश्वासक धावसंख्या उभारता आली नाहीये.

सध्या संपूर्ण देशभरात विश्वचषकाचा फिव्हर सुरु आहे. प्रत्येक चाहता आपापल्यापरीने भारतीय संघाला विविध पर्याय आणि सल्ले देत आहे. यामध्येच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने, संघात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी एक पर्याय सुचवला आहे.

स्पृहाने आपला हातात बॅट घेतलेला एक फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत, चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी माझा विचार व्हायला हरकत नाही असं गमतीने म्हटलंय. महत्वाची गोष्ट म्हणजे या फोटोवर तिच्या चाहत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 7:44 pm

Web Title: cricket world cup 2019 marathi actress spruha joshi offers unique solution to no 4 spot in team india psd 91
टॅग : Spruha Joshi
Next Stories
1 Video : धोनीला नशिबाची साथ! यष्टिचीत होण्यापासून थोडक्यात बचावला
2 Cricket World Cup 2019 : विराटचा अर्धशतकी खेळीचा चौकार, विंडीजविरुद्ध एकाकी झुंज
3 World Cup 2019 : हिटमॅनची विकेट ढापली? नेटीझन्स पंचांवर भडकले
Just Now!
X