News Flash

ड्वेन ब्राव्होची बॉलीवूडमध्ये एण्ट्री!

हिंदी गाणे असल्याने सुरूवातीला ब्राव्होला थोडे कठीण गेले.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या 'तुम बिन टू' या आगामी चित्रपटात ब्राव्हो एक गाणे गाताना दिसणार आहे.

क्रिकेटच्या मैदानात आपल्या अष्टपैलू कामगिरी आणि अनोख्या स्टाईलने भारतीयांची मनं जिंकलेला वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो आता लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याआधी ब्राव्होच्या गाण्यांचा अल्बम देखील भारतात मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ‘तुम बिन टू’ या आगामी चित्रपटात ब्राव्हो एक गाणे गाताना दिसणार आहे. नुकतेच ब्राव्हो या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी मुंबईत आला होता. हिंदी गाणे असल्याने सुरूवातीला ब्राव्होला थोडे कठीण गेले. मात्र, ब्राव्होने हिंदी उच्चारांवर मेहनत घेऊन अखेर अनेक प्रयत्नांअंती हे गाणे रेकॉर्ड केले. हिंदी गाण्याच्या ओळी देखील माझ्या लक्षात राहत नव्हत्या, पण सगळ्यांच्या मदतीमुळे मी गाऊ शकलो, असे म्हणत ब्राव्हो दिग्दर्शकांसह चित्रपटाशीनिगडीत सर्व व्यक्तींचे आभार मानले.

वाचा: ड्वेन ब्रावो झाला दीपिकाचा दिवाना..

ड्वेन ब्रावोने हिंदी भाषा शिकण्याच्या त्याच्या अनुभवाबद्दलही सांगितले. हिंदी भाषा शिकणे थोडे अवघड असले तरीही गाणे गाण्याच्या संपूर्ण अनुभवाचा आनंद घेतल्याचेही ब्रावो म्हणाला. विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय असणाऱ्या ब्रावोने क्रिकेटला नेहमीच आपले प्रथम प्राधान्य असणार आहे, असेही स्पष्ट केले. गाणे गाण्यासोबतच आगामी काळात अभिनेता म्हणून संधी मिळाली, तर आपल्याला अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफसोबत काम करायला आवडेल, असे ब्राव्हो म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 6:02 pm

Web Title: cricketer dwayne bravo to make bollywood singing debut
Next Stories
1 विराट कोहली हा मोठा कंजूष व्यक्ती- युवराज सिंग
2 पाहा: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणे असा करतोय जीममध्ये व्यायाम
3 ‘लोकेश राहुल आणि मुरली विजय यांनी भारताच्या डावाला सुरूवात करावी’
Just Now!
X