27 November 2020

News Flash

आता अभिनयाच्या मैदानावरही युवराज मारणार षटकार?

भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार ‘इनसाइड एज २’

युवराज सिंग

भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार ‘इनसाइड एज २’ या वेब सीरिजमध्ये युवराज भूमिका साकारणार आहे. क्रिकेटवर आधारित ‘इनसाइड एज’ हा वेब सीरिज गेल्या वर्षी अॅमेझॉन प्राइमवर लाँच झाला होता. यामध्ये विवेक ओबेरॉय, अंगद बेदी आणि रिचा चड्ढा यांनी भूमिका साकारल्या होत्या. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता त्याच्या दुसऱ्या सिझनसाठी युवराजला विचारण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

आपल्या तुफान फलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा क्रिकेटर युवराज सिंग सर्वांचाच आवडता आहे. अफलातून फलंदाजी करणारा क्रिकेटर किंवा कर्करोगालाही लढा देऊन बरा झालेला युवराज सर्वांनाच परिचित आहे. अभिनयाची चुणूक युवीमध्ये लहानपणापासूनच होती. गायक आणि अभिनेता हंस राज हंस यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेहंदी शग्ना दी’ या पंजाबी चित्रपटात युवराज झळकला होता. १९९२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यावेळी युवराज फक्त ११ वर्षांचा होता. त्यामुळे आता या वेब सीरिजबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 5:03 am

Web Title: cricketer yuvraj singh to act in web series inside edge 2
Next Stories
1 जाणून घ्या, शाहरुखने ‘पद्मावत’ला का दिला होता नकार?
2 फ्लॅशबॅक : प्रत्येक काळात तरुण चित्रपट असतोच पण…..
3 FBवर ‘पद्मावत’ लीक, शेअर करणाऱ्यांनाही होऊ शकतो ५ लाखांचा दंड
Just Now!
X