मुंबई : डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हास्य कलाकार सुनील पाल यांच्याविरोधात अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्स्ल्टंट संघटनेच्या अध्यक्षा सुश्मिता भटनागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला आहे. सुनील पाल यांनी गेल्या महिन्यात एका वाहिनीला मुलाखत दिली होती. तसेच समाजमाध्यमातून चित्रफीत प्रसारित केली होती. त्यामध्ये करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची बदनामी होईल अशी आक्षेपार्ह विधाने त्यांनी केली होती. यावरून असोसिएशन ऑफ मेडिकल कन्स्ल्टंट संघटनेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.