29 September 2020

News Flash

डान्सिंग क्वीनचं नवं पर्व- ‘साईज लार्ज फुल चार्ज’

आरजे मलिष्का प्रथमच परीक्षकाच्या भूमिकेत

झी मराठी वाहिनीवर ‘डान्सिंग क्वीन’ या रिअॅलिटी शोचं नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सिझनचा थीम हटके आहे. ‘डान्सिंग क्वीन- साईज लार्ज फुल चार्ज’ या नावावरूनच शोच्या थीमचा अंदाज आला असेल. या शोमध्ये १५ वर्षे व त्यावरील वयोगटाच्या मुली व महिलांनी सहभाग घेतला आहे. त्यांचं वजन ७० किंवा त्याहून अधिक असलं पाहिजे, हीच एक अट आहे. येत्या २४ सप्टेंबरपासून हा सिझन सुरू होणार आहे.

नाट्यलेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला अद्वैत दादरकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. तर या स्पर्धेत नृत्यदिग्दर्शन ओंकार शिंदे करणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी व आरजे मलिष्का या शोचे परीक्षक असतील.

येत्या २४ सप्टेंबरपासून हा आगळावेगळा शो गुरुवात ते शनिवारी रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 8:13 pm

Web Title: dancing queen new season size large full charge ssv 92
Next Stories
1 लवकरच उलगडला जाणार ‘शहीद शिरीषकुमार’ यांचा जीवनप्रवास
2 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत धक्कादायक ट्विस्ट
3 चिरंजीवीचा नवा लूक पाहून चाहते हैराण; कलाकारांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
Just Now!
X