News Flash

एकेदिवशी निशाला लातूरला घेऊन जाणारच, सनीच्या पतीनं व्यक्त केली इच्छा

लातूरमधल्या दीड वर्षांच्या मुलीला दत्तक घेऊन सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी तिला नवं आयुष्य दिलं.

सनी आणि डॅनिअलनं २०१७ मध्ये एका अनाथ आश्रमातून मुलीला दत्तक घेतले होते.

बॉलिवूडची स्टार सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी २०१७ मध्ये एका अनाथ आश्रमातून मुलीला दत्तक घेतले होते. लातूरमधल्या दीड वर्षांची मुलगी निशाला तिनं दत्तक घेऊन नवं आयुष्य दिलं. सनी आणि डॅनिअलच्या या निर्णयाचं अनेकांनी भरभरून कौतुक केलं. या जोडप्याला सरोगसीद्वारे झालेली नोहा आणि अशेर ही  जुळी मुलंदेखील आहे. या तिन्ही मुलांच्या येण्यानं सनीचं कुटुंब पूर्ण झालं. मुलांच्या येण्यानं आयुष्य पूर्णपणे बदललं असं सनी आणि तिचा नवरा डॅनिअल मोठ्या अभिमानानं सांगतो.

पहिल्या दत्तक मुलीशी डॅनिअलची आता घट्ट नाळ जोडली आहे. एका मुलीचं बाप होणं म्हणजे काय असतं तो अनुभव डॅनिअलनं नुकताच ह्युमन्स ऑफ बॉम्बे या प्रसिद्ध फेसबुक पेजवर शेअर केला. ‘निशाला पाहताक्षणीच आम्ही तिच्या प्रेमात पडलो, तीच आम्हाला मुलगी म्हणून हवी होती. सर्वप्रकराच्या औपचारिकता पूर्ण केल्यानंतर निशा आमच्या घरी आली ती आल्यावर आम्हाला सर्वाधिक आनंद झाला. पण, ती वडील म्हणून माझा स्विकार करेल का? ही भीती सारखी मनात असायची. एकेदिवशी तिनं मला पप्पा अशी हाक मारली. ती धावत माझ्याकडे आली आणि माझ्या पायांना तिनं घट्ट पकडलं. हा आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता’ अशा अनेक सुखद आठवणींना डॅनिअलनं उजाळा दिला.

मात्र कधीतरी निशाला घेऊन लातूरला जायचंय आहे अशी इच्छाही व्यक्त केली. निशाचं आयुष्य आता पूर्णपणे बदललं आहे. पण तिच्यासारख्या अनेक मुलांबद्दल तिच्या मनात सहानभूती निर्माण व्हावी, तिनंही अशा मुलांना मदत करावी, त्यांचं आयुष्य जवळून पाहावं अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच योग्य वेळ आली की तिला आम्ही लातूरला घेऊन जाऊ असं डॅनिअल या मुलाखतीत म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 4:26 pm

Web Title: daniel weber wants to take nisha back to orphanage in latur
Next Stories
1 ‘गोल्ड’मुळे अक्षयच्या लोकप्रियतेत तुफान वाढ, असं केलं चाहत्यांनी प्रेम व्यक्त
2 Manto trailer: ‘गुलाम थे तो आजादी का ख्वाब देखते थे, और अब आजाद हुए तो….’
3 माझ्यात आणि कतरिनामध्ये सारं काही अलबेल -आलिया
Just Now!
X