News Flash

ठरलं! या दिवशी होणार ‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनची वापसी

दीड वर्षांनंतर दिशा पुन्हा दयाबेनच्या रुपात दिसणार आहे

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी लवकरच परतणार आहे. दिशा तब्बल दीड वर्षांनंतर या मालिकेत पुन्हा येणार आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये तिने प्रसूती रजा घेतली. त्यानंतर ती मालिकेत परतणार होती. मात्र बाळंतपणानंतर मालिकेत येण्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. यात तिने मानधनात वाढ करण्याचंही सांगितलं होतं. निर्मात्यांनी तिला ३० दिवसांचा अल्टिमेटमसुद्धा दिला होता. पण दिशाकडून काहीच उत्तर न आल्याने त्यांनी दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीला निवडल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र अखेर पुन्हा एकदा दिशाच दयाबेनच्या रुपात पाहायला मिळणार आहे.

दिशाची ‘तारक मेहता…’मध्ये ग्रॅण्ड एण्ट्री होणार आहे. गरबा खेळण्याच्या हटके स्टाइलमुळे लोकप्रिय झालेल्या दयाची एण्ट्रीसुद्धा नवरात्रीच्याच पार्श्वभूमीवर होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच दिशा पुन्हा एकदा दयाच्या रुपामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. विशेष म्हणजे या नवरात्रीमध्ये दयाबेनचा गरबा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

दरम्यान, आई झाल्यानंतर पुन्हा कॅमेरासमोर काम करताना दिशाला अनेक अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता तिची ही समस्यादेखील दूर होणार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. लहानांपासून थोरांपर्यंत या मालिकेचे चाहते पाहायला मिळतात. यातील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. त्यामुळे जर दिशा मालिकेत परत येणार असल्यास चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 12:02 pm

Web Title: dayaben disha vakani to make comeback on taarak mehta ka ooltah chashmah in navaratri ssj 93
Next Stories
1 Photo : जॅकी श्रॉफची लेक बॉयफ्रेंडसोबत दिसली बोल्ड अंदाजात, फोटो व्हायरल
2 …म्हणून सलमानच्या माजी अंगरक्षकाला पोलिसांनी दोरखंडानं पकडलं
3 आर. माधवनच्या मुलाची कौतुकास्पद कामगिरी, देशाला मिळवून दिलं रौप्य पदक
Just Now!
X