News Flash

सिनेमाचं सेलिब्रेशन! काजोल- शाहरुखनं सोशल हॅण्डलमध्ये केला ‘हा’ बदल

पाहा, दोघांनी नेमका कोणता बदल केला आहे.

काही चित्रपट हे प्रदर्शनानंतरही बरीच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालून असतात. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे अर्थात डीडीएलजे. राज आणि सिमरनची प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर झाली आणि रातोरात चित्रपट हिट झाला. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट या दोन्ही कलाकारांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर काजोल आणि शाहरुख खानने चक्क त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलची नावं बददली आहेत.

या चित्रपटामध्ये शाहरुखने राज मल्होत्रा आणि काजोलने सिमरन ही भूमिका साकारली होती. या दोन्ही भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्यामुळेच आज या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटची नावं बदलली आहेत.

काजोलने तिचं नाव बदलून सिमरन केलं आहे. तर शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचं नाव राज मल्होत्रा केलं आहे. सोबतच या दोघांनी चित्रपटासंबंधीत एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. विशेष म्हणजे या दोघांनी दिलेली कॅप्शनही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, या चित्रपटातील प्रत्येक संवाद, सीन तुफान गाजले. यातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.आज या लोकप्रिय चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्ष झाले. मात्र, या चित्रपटाची क्रेझ, भूरळ आजही प्रेक्षकांमध्ये असल्याचं पाहायला मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:22 pm

Web Title: ddlj shah rukh khan kajol change twitter name to raj and simran ssj 93
Next Stories
1 कार्तिक आर्यन झळकणार ‘तेरे नाम’च्या सिक्वलमध्ये? नवा लूक होतोय व्हायरल…
2 मुकेश खन्नांच्या टीकेवर अखेर कपिल शर्माने सोडलं मौन; म्हणाला…
3 ‘कामाची लगबग आणि लेकरासाठी तुटणारा जीव’; तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेची तळमळ
Just Now!
X