लॉकडाउनमध्ये घरात अडकलेल्या नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी दूरदर्शनने ९०च्या दशकातील मालिका पुन्हा सुरु केल्या. यामध्ये पहिल्या आठवड्यापासून रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका टीआरपीमध्ये वरच्या स्थानावर होती. ही मालिका पुन्हा एकदा सुरु झाल्यामुळे यातील कलाकारही सोशल मीडियावर जोरदार ट्रेण्ड झाले. या मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियादेखील इन्स्टाग्राम, ट्विटरच्या माध्यमातून आता चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्येच त्यांनी एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. त्यांच्या बहीण-भावासोबतचा हा लहानपणीचा फोटो आहे.

‘माझी छोटी बहीण आरती आणि छोटा भाऊ हिमांशू यांच्यासोबतचा हा फोटो.. वेळेनुसार आमच्या नात्यातील प्रेम दृढ होत गेलं आणि आता आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभे असतो’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

आणखी वाचा : ‘ही’ अभिनेत्री एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी घेते इतके पैसे; कमाई जाणून व्हाल थक्क!

दीपिका यांचा लहानपणीचा फोटो पाहून त्यांची मुलगी निधीचा फोटोच पाहिल्याचा भास झाला, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. अनेकांनी ‘सीता माँ’ म्हणत त्यांना वंदन केलं. ९० च्या दशकात रामायणमध्ये सीता ही भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्री दीपिका चिखलिया चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं होतं. त्याकाळी त्यांची तुफान क्रेझ होती.