20 October 2020

News Flash

रणवीरची ऑनस्क्रीन पत्नी साकारण्यास दीपिका तयार

'८३' चित्रपटात रणवीर साकारणार कपिल देव यांची भूमिका तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण

अभिनेता रणवीर सिंग व दीपिका पदुकोण यांना ऑनस्क्रीन एकत्र पाहण्याची चाहत्यांची फार इच्छा आहे. ही इच्छा लवकरच पूर्ण होणा आहे. कारण ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’नंतर आता पुन्हा एकदा ही बहुचर्चित जोडी एकत्र झळकणार असल्याचं कळतंय. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये ही जोडी ऑनस्क्रीनसुद्धा पती-पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.

भारताच्या इतिहासात २५ जून १९८३ ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे १९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह हा तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत असणार आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं असून ‘चक दे इंडिया’चे दिग्दर्शक कबीर खान यांनीच ‘८३’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रणवीर क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका वठवत असल्यामुळे या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्यासाठी तो कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 6:12 pm

Web Title: deepika confirms she will play ranveer singh wife in world cup film 83 ssv 92
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : दोन्ही बाजूंनी ढोल वाजवणाऱ्या माधवला शिव विचारणार जाब
2 ‘टायगर कहा हैं’, आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा एकत्र डिनर
3 थरकाप उडवायला येतोय विकी कौशलचा ‘भूत’
Just Now!
X