30 September 2020

News Flash

रणवीर -दीपिकानं चार वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा

हे गुपित दोघांनीही त्यांच्या चाहत्यांपासून लपवून ठेवलं होतं, मात्र एका मुलाखतीत दीपिकानं ते उघड केलं आहे.

दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग हे दोघंही बॉलिवूडमधलं सध्याच्या घडीचं आवडतं जोडपं आहे. गेल्याच महिन्यात इटलीतल्या नयनरम्य परिसरात ते दोघंही मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकले. या दोघांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली, सहा वर्षांपासून ते दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आणखी एक गुपित दोघांनीही त्यांच्या चाहत्यांपासून लपवून ठेवलं होतं. हे गुपित नुकतंच एका मुलाखतीत दीपिकानं  उघड केलं.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत  रणवीरशी चार वर्षांपूर्वीच साखरपुडा केला असल्याचं दीपिकानं मान्य केलं. २०१६ मध्ये पहिल्यांदा या दोघांनीहा साखरपुडा केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र या वृत्तावर दोघांनी मौन धारण करणं पसंत केलं होतं. आता मात्र सारखपुडा फार पूर्वीच झाला असल्याचं मान्य करून तिनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर विवाहबंधनात अडकले. १४ नोव्हेंबरला पारंपरिक कोंकणी आणि १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीनं दोघांचा विवाहसोहळा पार पडला. इटलीटत लेक कोमो या नयनरम्य परिसरात हा विवाहसोहळा पार पडला होता. या सोहळ्यानंतर दोघांनी बंगळुरू आणि मुंबईत जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 12:29 pm

Web Title: deepika padukone and ranveer singh got engaged 4 years ago
Next Stories
1 Flashback 2018 : वर्ष वेबसीरिजचं.. सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरीज, मिर्झापूर आणि बरंच काही..
2 Thackeray Movie : मराठीत पुन्हा डबिंग करा; बाळासाहेबांना या व्यक्तीचा आवाज द्या- प्रेक्षकांची मागणी
3 ‘झिरो’मधील ती भूमिका रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपपासून प्रेरित?
Just Now!
X