01 March 2021

News Flash

दीपिका-रणवीरनं घेतला तब्बल इतक्या कोटींचा बंगला

दोघांनीही स्वत:साठी मुंबईतील जुहू परिसरात आलिशान घर विकत घेतलं असल्याचं समजत आहे.

बॉलिवूडमधलं लोकप्रिय जोडपं दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग हे दोघंही गेल्याच आठवड्यात विवाहबंधनात अडकले. नुकतेच ते दोघंही मुंबईत परतले आहे. सध्या दीपिका रणवीरच्या मुंबईतील घरी राहत आहे. मात्र या दोघांनीही स्वत:साठी मुंबईतील जुहू परिसरात आलिशान घर विकत घेतलं असल्याचं समजत आहे.

जुहूमध्ये दीप-वीरनं स्वत:साठी आलिशान बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास ५० कोटी रुपये असल्याचं समजत आहे. या घराचं इंटिरिअरचं काम सुरू आहे. दीपवीरला आपल्या मनाप्रमाणे त्याचं घर सजवलेलं हवं आहे. हे काम पूर्ण व्हायला आणखी काही काळाचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत रणवीर कुटुंबीयांसोबत मुंबईतील घरी राहणार आहे.

१४ आणि १५ नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीर इटलीतील एका आलिशान व्हिलामध्ये विवाहबंधनात अडकले. २१ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये दोघांनी रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. तर २८ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन पार्टी होणार आहे. या दोन्ही पार्टी रणवीरचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि बॉलिवूडसाठी असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 5:49 pm

Web Title: deepika padukone and ranveer singh have bought a new house in mumbai
Next Stories
1 Photo : सईने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो?
2 करिनाला ‘छोटी माँ’ म्हटलेलं आवडणार नाही- सारा
3 तैमुरच्या एका फोटोची किंमत माहीत आहे का?
Just Now!
X